कांदाचाळ उभारणी प्रकल्प 2025-26 | राष्ट्रीय कृषी विकास योजना | संपूर्ण माहिती पात्रता, अर्ज, प्रक्रिया

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शासनाच्या कांदा साठवण्याची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत राबवली जाणार कांदाचाळ उभारणी प्रकल्प पुन्हा एकदा मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पासाठी 2022-23 आणि 23-24 या कालावधीत 5100 लाखाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती मात्र या निधीचा काही रक्कम खर्च न झाल्यामुळे प्रकल्पाची मुदत वाढवून आता 2025-26 वर्षात हा प्रकल्प पुन्हा राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे चला तर मग या प्रकल्पा बद्दल सर्व माहिती अनुदान पात्रता कागदपत्र आणि अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत पाहुया

प्रकल्पाबाबत घेतलेला ताजा निर्णय

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या 40 व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत पूर्वी मंजूर झालेल्या 5100 लाख निधीपैकी उर्वरित 3315 लाखाचा रकमेचा वापर आता सन 2025-26 मध्ये केला जाणार आहे सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार कांदाचाळ घटकासाठी रुपये 4000 प्रति टन याप्रमाणे अनुदान दिले या सुधारित निकषानुसार उर्वरित निधीचा कार्यक्रम राबवण्यास सरकारने अंतिम मान्यता दिली आहे याचा सरळ अर्थ 2025-26 या वर्षात शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी भक्कम आणि आधुनिक कांदाचाळ उभारणीसाठी मोठे अनुदान मिळणार आहे

कांदाचाळ उभारणी प्रकल्प म्हणजे काय

कांदा शेतीत सर्वात मोठी समस्या म्हणजे नासाडी कांद्याची साठवणूक व उष्णता दमटावाc यामुळे मोठी प्रमाणात खराब होती ही नासाडी 15 टक्के ते 40 टक्के पर्यंत पोहोचते या समस्येवर उपाय म्हणून कांदाचाळ उभारणी प्रकल्प राबवला आहे

या प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणारे फायदे :

  • आधुनिक वायू वायुविजनयुक्त कांदा चाळ बांधणी
  • साठवण यामुळे नासाडी कमी
  • बाजार भाव जास्त असताना विक्री करता येते
  • शेतकऱ्यांना अधिक नफा
  • टिकाऊ व सुरक्षित बांधकाम

अनुदानाची रचना (subsidy Pattern)

सुधारित मार्गदर्शिका सूचनेनुसार :

प्रति टन साठवण क्षमतेवर अनुदान 4000 प्रति टन उदाहरण जर शेतकरी 50 टन क्षमतेची कांदाचाळ उभारणार असेल 50×4000= रू 2,00,000 लाख अनुदान

कांदाचाळ उभारणी चे नियम व अटी

बांधकाम शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जमिनीवरच असावे
जमीन मालकी हक्काचे कागदपत्र आवश्यक
बांधकामाचे टेक्निकल डिझाईन शासनाच्या मान्यता प्राप्त मानकांनुसार असावे
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तपासणी करूनच अनुदान वितरित केले जाईल 
प्रकल्पाचा लाभ एका शेतकऱ्याला एकदाच मिळेल

कोण अर्ज करू शकतात Eligibility Criteria

  1. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कांदा उत्पादक शेतकरी
  2. वैयक्तिक शेतकरी समूह फपो, शेती संस्था
  3. जमिनीचा सातबारा उतारा
  4. संबंधित तालुक्यातील कृषी विभागाची पात्रता

आवश्यक कागदपत्रे (documents Required)

अर्ज करतांना खालील कागदपत्रे आवश्यक राहतील

शेतकऱ्याचा आधार कार्ड

7 / 12 उतारा जमिनीचे कागदपत्र

बँक पासबुक

मोबाईल नंबर

फोटो

प्रकल्पाचा अंदाज पत्रक (Estimate)

बांधकाम नकाशा डिझाईन

स्वयंघोषणापत्र

ग्रामपंचायत परवानगी (लागू असल्यास)

अर्ज कुठे करावा Application process

कांदाचाळ उभारणी प्रकल्पाचा अर्ज दोन प्रकारे केला जाऊ शकतो ऑनलाईन किंवा ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया केलेली ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पर्याय करा

स्टेप 1 : महाराष्ट्र कृषी विभागाचे पोर्टल उघडा

महाराष्ट्र अधिकृत पोर्टल mahadbtmahait. gov.in किंवा agrimaharshtra. gov. in

स्टेप 2 तुमची प्रोफाईल तयार करा : आधार क्रमांक OTP व्हरिफिकेशन बँक तपशील जोडणे

स्टेप 3 शेती कृषी योजना विभाग निवडा

स्टेप 4 कांदाचाळ उभारणी प्रकल्प निवडा

जमिनीची माहिती

बांधकाम क्षमता उत्तम (टन मध्ये)

बांधकामाचा अंदाज आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

स्टेप 6 सबमिट करा व अर्जाचा क्रमांक नोंदवा

स्टेप 7 कृषी सहाय्यक तपासणी

तपासणी पथक शेतकऱ्यांची जमीन पाहिल

बांधकाम पूर्ण झाल्यावर अंतिम तपासणी

स्टेप 8 अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा

स्टेप 2) ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (कृषी कार्यालय)

जर अर्ज शक्य नसेल तर जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करा अर्ज फार्म द्या कागदपत्रे जोडून सादर करा शेतात भेट देऊन तपासणी प्रकल्प पूर्ण झाल्यावर अनुदान मंजूर

योजनेची मुख्य फायदे (Benefits)

शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत बचत कांदा नासाडी मोठ्या प्रमाणात कमी नियंत्रण शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न शेतकऱ्याच्या सुरक्षितेसाठी मजबूत टिकाऊ साठवणूक व्यवस्था

अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय जाहीर

अमरावती जिल्ह्यात आंबिया बहार 2024 पिक विमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

लाडकी बहीण योजनेवर मोठा अपडेट : 52 लाख महिला अपात्र नाहीत सरकारकडून महत्त्वाचे स्पष्टता

कृषी विभागाच्या 12 योजनेवर 60%ते 90% अनुदान अहिल्या नगर जिल्ह्यासाठी मोठा निर्णय

महत्त्वाच्या सूचना : अर्ज करताना चुकीची माहिती देऊ नये बांधकाम सुरू करण्यापूर्वी तांत्रिक मार्गदर्शन घेणे आवश्यक योग्य वायुविजन व्यवस्था अनिवार्य कृषी विभागाकडून वेळोवेळी बदल केले जाऊ शकतात

निष्कर्ष : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सुरू असलेला कांदाचाळ उभारणी प्रकल्प 2025-26 हा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे अनुदान 4000 रुपये प्रति टन इतकी मोठी असून शेतकऱ्यांनी याचा वेळेवर अर्ज करून लाभ घेणे फायदेशीर ठरेल कांदा चाळ उभारल्यामुळे शेतकऱ्यांना नासाडी कमी होईल चांगला भाव मिळेपर्यंत साठवणूक जास्त नफा असे थेट फायदे मिळतील

Leave a Comment