जायकवाडी धरणात दमदार आवक मराठवाड्याचा पाणी साठा प्रश्न सुटणार

मराठवाड्यातील जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरण यंदाच्या पावसाळ्यात एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून मागच्या 25 वर्षाच्या इतिहासात प्रथम जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांवर पोहोचला आहे काल सोमवार सात जुलै 2025 दुपारी 12 वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 53 टक्के पर्यंत पोहोचला पण पाण्याची आवक प्रतिसेकंद 22,हजार 222 इतकी प्रचंड वेगाने सुरू आहे

तसेच गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्यातील पाणी टंचाईचा सामना करावा लागतो जायकवाडी धरण भरण्यासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागते आणि एकदा दमदार पावसाच्या अभावी धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही किंवा भरण्यास विलंब होतो तर मागील काही वर्षात कमी प्रजन्यमान किंवा वरच्या धरणांमधून कमी पाणी सोडल्यामुळे धरणाची पातळी चिंताजनक स्थिती राहिली तर राहिली होती

अशा स्थितीमध्ये जुलाई च्या पहिल्याच आठवड्यात 50 % पाणी साठा होणे ही मराठवाड्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी मानले जाते सध्या धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने हे धरण याच महिन्यात पूर्ण क्षमतेने भरल अशी परिस्थिती निर्माण होत आहे धरणाच्या कार्यक्षमतेत आणि वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी वेगाने वाढत आहे

जायकवाडी धरणाचे मराठवाड्यातील शेती पाण्याच्या पाणीसाठा साठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने हा विक्रमी पाणीसाठा मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासादायक दिलासा घेऊन आला आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment