Farmer KYC Pending Jalna : जालना जिल्ह्यात शेती पीकसाठी प्राप्त झालेल्या 431 कोटी 81 लाख रुपये मदती पैकी 185 कोटी 18 लाख रुपये मदत गुरुवार पर्यंत दि. 13 वाटप झाली आहे तर सुमारे 73 कोटी 86 लाख रुपये तर रब्बीसाठी बियाणी व इतर अनुसूचित बाब करता अतिरिक्त 10,000 मदत वाटपाचे समोर 47 कोटी 85 लाख रूपये वाटप केवायसी अभावी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिले आहे
यांच्या माहितीनुसार जिल्हा जालना जिल्ह्यात 6 लाख 29 हजार 651 शेतकऱ्यांना शेती पिकाच्या (DBT fund distribution Jalna) डीबीटी द्वारे वाटता वाटप करता 431 कोटी 81 लाख रुपये प्राप्त झाली मदत वाटपासाठी सुमारे 3 लाख 76 हजार 716 शेतकऱ्यांना याद्या 243 कोटी 30 लाख रुपये मदत मिळण्याच्या अनुषंगाने अपलोड केल्या त्यापैकी 2 लाख 83 हजार 660 शेतकऱ्यांना 15 कोटी 18 लाख रुपयांची मदत वाटप केली गेली व 1 लाख 16 हजार 795 लाभार्थ्याची 76 कोटी 83 लाख रुपये मदत केवायसी मुळे प्रलंबित आहे प्राप्त निधीच्या तुलनेत सुमारे 56.34 टक्के लाभार्थी यादी अपलोड केल्या गेल्या असल्या तर तरी प्राप्त निधीच्या तुलनेत सुमारे 42.88 टक्के निधी वाटप झाल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी दिली
33 टक्के अतिरिक्त 10 हजार रुपये अनुदान वाटप
शासनाच्या निकषाप्रमाणे रब्बी हंगामामध्ये बियाणे तसेच इतर अनुषंगिक बाबी करता अतिरिक्त दहा हजाराची मदत शासनाने जाहीर केली होती त्यासाठी जिल्ह्यातील सहा लाख 21 हजार 388 शेतकऱ्यांना देण्याकरिता 461 कोटी 52 लाखाचा निधी प्राप्त झाला होता प्राप्त झालेल्या या निधीपैकी 2 लाख 22 हजार 632 शेतकऱ्यांना सुमारे 154 कोटी 16 लाख रुपये मदत निधी वाटप करण्यात आले आहे आणि प्राप्त निधीच्या तुलनेत हे वाटप सुमारे ते 30% ते 40 टक्के इतकी आहे दुसरीकडे 58,661 शेतकऱ्यांना वाटपाचे 47 कोटी 85 लाख रुपये केवायसी मुळे प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे
तालुकानिहाय अतिरिक्त 10,000 मदत वितरण एकूण निधी- (कोटीमध्ये)
- जालना 25.45
- बदनापूर 14.03
- परतूर 13.95
- भोकरदन 30.44
- मंठा 19.34
- घनसावंगी 14.98
- अंबड 28.38
शेती पिकांना नुकसानीसाठी डीबीटी द्वारे मदत वाटप (कोटीत रक्कम )
घनसावंगी 28.19
जाफराबाद 7.25
भोकरदन 26.85
जालना 30. 25
परतुर 16.95





