How to Download Jeevan Pramaan Digitallife Certificate : 5 ते 10 मिनिटात डाऊनलोड करा हयातीचा दाखला..

पेन्शन धारकांसाठी जीवन प्रमाण हायातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे प्रत्येक पेन्शनधारकांना वर्षातून एकदा हा हायातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते या प्रमाणपत्र मुळे संबंधित व्यक्ती जिवंत असल्याची खात्री सरकारला मिळते आणि पहिले हायातीचा दाखला काढण्यासाठी बँक पोस्ट किंवा सरकारी कार्यालयात जावे लागत असे परंतु आता तंत्रज्ञानामुळे हे काम खुप सोपे झाले आहे हा तुम्ही फक्त मोबाईलच्या मदतीने घरबसल्या दोन ते पाच मिनिटात जीवन प्रमाण काढू शकता या लेखात आपण मोबाईलवरून जीवन प्रमाण कसे तयार करायचे याचे संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत जाणून घेऊया

जीवन प्रमाण म्हणजे काय

जीवन प्रमाण म्हणजे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पेन्शनधारक जिवंत असल्याचे अधिकृत नोंद या प्रमाणपत्र द्वारे केली जाते तर सरकारने पेन्शनधारकांना सोय व्हावी म्हणून डिजिटल पद्धतीने हे प्रमाणपत्र काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मोबाईल ॲपच्या मदतीने चेहरा स्कॅन करून बायोमेट्रिक हाताळणी केली जाते आणि त्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र तयार होते

जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक गोष्टी

मोबाईलवरून जीवन प्रमाणपत्र प्रमाण काढण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
  • स्मार्टफोन इंटरनेट कनेक्शन
  • फेस स्कॅन साठी आधार आर डी ॲप
  • जीवन प्रमाण पत्र मोबाईल ॲप

ही सर्व साधने उपलब्ध असल्यास तुम्ही सहजपणे काही मिनिटात जीवन प्रमाण तयार करू शकता

मोबाईलवर जीवन प्रमाण ॲप डाउनलोड कसे करावे

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये जीवन प्रमाणाचे अधिकृत ॲप डाऊनलोड करा हे ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असते ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा मोबाईल मध्ये प्लेस्टोर उघडा सर्च बॉक्स मध्ये Jeevan Pramaan किंवा जीवन प्रमाण सर्च करा अधिकृत ॲप डाऊनलोड करा ॲप इन्स्टॉल ओपन करा ओपन केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते

ऑपरेटर रजिस्ट्रेशन प्रक्रिया

ॲप ओपन केल्यानंतर प्रथम Operator Identification Registration करावे लागते यामध्ये खालील माहिती भरावी लागते आधार नंबर मोबाईल नंबर ईमेल आयडी ही माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे त्यानंतर आधार ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो तो टाकून पुन्हा सबमिट करावे त्यानंतर ऑपरेटर चे नाव विचारले जाईल आणि कॅन्सर स्वीकारले करावी लागेल

फेसस्कॅन द्वारे बायोमेट्रिक वेरीफिकेशन

आता पुढील टप्प्यात फेस बायोमेट्रिक पडताळणी करावी लागते यासाठी मोबाईल मधील face Aadhar id app निवडणे त्यानंतर कॅमेरा ओपन होईल कॅमेरा मध्ये ऑपरेटरचा चेहरा योग्य प्रकारे स्कॅन करावा स्कॅन पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक वेरीफिकेशन योग्य यशस्वी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल

पेन्शन संबंधित माहिती तपासणे

पेन्शनर व्हेरिफिकेशन प्रक्रिया ऑपरेटर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आता पेन्शन धारकांची माहिती भरावी लागते या खालील माहिती द्यावी लागते आधार नंबर मोबाईल नंबर ईमेल आयडी ही माहिती भरल्यानंतर पुन्हा सबमित वर क्लिक करावे त्यानंतर आधार लिंक मोबाइल नंबर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरिफाय करावा पेन्शन संबंधित माहिती तपासणे ओटीपी व्हरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर पेन्शन धारकांची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल त्यात खालील माहिती असते नाव पेन्शन विभाग सेवा तपशील रोजगार संबंधित माहिती जर रोजगार बद्दल प्रश्न विचारला असेल तर त्याठिकाणी No म्हणजेच नाही निवडावे आणि पुढे जाण्यासाठी Next वर क्लिक करावे

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी कन्सेट

पुढील स्क्रीनवर तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल फॉर्म सबमिट करण्यापूर्वी दोन घोषणा (Consent) स्वीकाराव्या लागतात त्या दोन पायावर ती करून Confirm बटणावर क्लिक करावे त्यानंतर पुन्हा एकदा फेस स्कॅन करण्याची प्रक्रिया सुरु होईल पेन्शनचा फ्रेश स्कॅन आता आधार आयडी ॲपच्या मदतीने पेन्शनधारकांचा चेहरा कॅमेरा मध्ये स्कॅन करावा लागतो स्कॅन पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक वेरीफिकेशन यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे जीवन प्रमाण तयार होईल

जीवन प्रमाण आयडी मिळणे

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Jeevan Pramaan ID दिला जातो हा आयडी खूप महत्त्वाचा असतो कारण त्याच आयडी च्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन प्रमाण डाऊनलोड करू शकता हा आयडी सुरक्षित ठेवणे ठिकाणी लिहून ठेवावे

जीवन प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे

जीवन प्रमाण डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

  1. सर्वप्रथम मोबाईल मध्ये गुगल उघडा
  2. Jeevan Pramaan सर्च करा
  3. Pensioner Login पर्याय निवडा Jeevan Pramaan ID टाका
  4. Generate OTP वर क्लिक करा

त्यानंतर मोबाईल ओटीपी येईल तो OTP टाकून Verify करा त्यानंतर डाउनलोड Download Certificate असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड life (certificate for pensioners download) करू शकता

जीवन प्रमान काढण्याचे फायदे

मोबाईलवरून जीवन प्रमाण काढण्याचे अनेक फायदे आहेत बँक किंवा कार्यालयात जाण्याची गरज नाही फक्त काही मिनिट मध्ये प्रक्रिया पूर्ण होतात घरबसल्या सेवा उपलब्ध करून घेता येतात डिजिटल प्रमाणपत्र सुरक्षित रहाते पेन्शन प्रक्रिया वेगाने होते

निष्कर्ष. आजच्या डिजिटल युगात सरकारी सेवा अधिक सोपे आणि सुलभ झाले आहेत जीवन प्रमाण अशीच एक महत्त्वाची सेवा आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे मोबाईल ॲपच्या मदतीने फक्त दोन ते पाच मिनिटात घरबसल्या हायातीचा दाखला तयार करता येतो जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी पेन्शन धारक असेल तर ही प्रक्रिया नक्कीच वापरा यामुळे वेळ पैसा आणि मेहनत या दोन्ही गोष्टींची बचत होते

Leave a Comment