how to apply for pmfme scheme : प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सुवर्णसंधी, 10 लाखांपर्यंत कर्ज

जिल्ह्यातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येणारी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना PMFME ही योजना ग्रामीण उद्योजकतेसाठी मोठी संधी ठरत आहे कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि व उद्योजकांना आर्थिक पाठबळ या तिन्ही स्तरावर या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे विशेष बेरोजगार युवक युवती महिला स्वयंसहायता गट आणि शेतकरी उत्पादन गटांसाठी ही योजना स्वावलंबेचा प्रभावी मार्ग ठरत आहे

pradhan mantri sukshma anna prakriya yojana योजनेची पार्श्वभूमी कमी आणि उद्दिष्ट

ग्रामीण भागात मोठ्या उद्योगांची कमतरता असल्याने रोजगाराच्या संधी मर्यादित होत्या आणि कौशल्य आणि इच्छाशक्ती असूनही भांडवलाच्या अभावामुळे उद्योग सुरू करणे खूप कठीण होत आहेत ही समस्या लक्षात घेऊन सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राला संघटित सूक्ष्म रक्षण आणि स्पर्धात्मक बनवण्याकरिता उद्देशाने PMFME योजना सुरू करण्यात आली आहे 2020-21 ते 2024-25 राबवण्यात येणाऱ्या या योजनेत केंद्र व राज्य शासनाचा निधी अनुक्रमे 60:40 या प्रमाणात दिला जातो योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारीक अर्थव्यवस्थेत आणणे आणि याची गुणवत्ता बाजारपेठ वाढवणे

कोणत्या उद्योगांना मिळतो लाभ

pmfme scheme योजनेअंतर्गत कृषी आधारित विविध प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते त्यासाठी खालील प्रकाराचा समावेश होतो

नाशिवंत कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग (भाजीपाला फळे) 
तृणधान्य व कडधान्ये प्रक्रिया 
तेलबिया प्रक्रिया उद्योग 
मसाला प्रक्रिया व पॅकेजिंग
दुग्धजन्य पदार्थ निर्मिती 
मत्स्य व कुक्‍कुट खाद्य उत्पादन 

याशिवाय अस्तित्वातील सूक्ष्म उद्योगांचे आधुनिकीकरण नवीन युनिटची उभारणी कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा आणि ब्रेडिंग विपणनासाठीही आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे

35% पर्यंत अनुदान 10 लाखाची मर्यादा

pmfme loan apply या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 35 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाते हे अनुदान जास्तीत जास्त 10 लाख रुपये पर्यंत मर्यादित आहे त्यामुळे कमी गुंतवणुकीत उद्योग सुरू करू इच्छिताणाऱ्या उद्योगांसाठी ही सुवर्णसंधी आहे मात्र प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के रक्कम लाभार्थ्यांनी ( स्वो हिस्सा ) गुंतवणे आवश्यक असेल उर्वरित रक्कम बँक कर्जाच्या स्वरूपात मिळेल या पद्धतीमुळे लाभार्थ्यांचा आर्थिक सहभाग निश्चित आणि प्रकल्पाची जबाबदारी वाढते

कोण अर्ज करू शकतात ?

PMFME योजनेसाठी खालील घटक पात्र असतील

बेरोजगार युवक आणि युवती

महिला व पुरुष स्वयंसहायता गट (SHG)

शेतकरी उत्पादन गट (FPO) व कंपन्या

सरकारी संस्था

कृषी आधारित खाजगी कंपन्या

विशेष म्हणजे महिला उद्योग आणि ग्रामीण भागातील तरुणांना या योजनेतून मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत

pmfme scheme offline apply – अर्ज प्रक्रिया कशी करावी

योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ ठेवण्यात आली आहे इच्छुकांनी खालील टप्पे पूर्ण करावीत

  1. प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित विभागाची संपर्क साधावा
  2. सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा
  3. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा
  4. बँक कर्ज प्रक्रिया नंतर प्रकल्प मंजुरी मिळते
  5. अधिकृत माहिती आणि मार्गदर्शनासाठी Ministry of Food Processing Industries (MoFPl) या अधिकृत संकेतस्थळावर देखील माहिती उपलब्ध असते

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना साधारणपणे खालील कागदपत्रांची आवश्यकता असते

  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • बँक पासबुक प्रत
  • प्रकल्प अहवाल (DPR)
  • यंत्रसामग्री कोटेशन
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (लागू असल्यास)
  • गट / संस्थेची नोंदणी कागदपत्रे (लागू असल्यास)

One District one Product संकल्पना

One District one Product संकल्पना या योजनेअंतर्गत (ODOP) या संकल्पनेलाही महत्त्व देण्यात आले आहे प्रत्येक जिल्ह्यातील खास उत्पादनावर आधारित उद्योगांना प्राधान्य दिले जाते यामुळे त्या उत्पादनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख मिळण्यास मदत होते

मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

जिल्हास्तरावर नियुक्त संसाधन व्यक्ती त्यांना मोफत मार्गदर्शन करतात प्रकल्प अहवाल तयार करणे बँक प्रक्रियेचा पाठपुरावा कर्ज वितरण या संदर्भात संपूर्ण सहाय्य दिले जाते काही प्रमाणात प्रकरणांमध्ये उद्योगात उद्योगासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात

ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना

अन्न प्रक्रिया उद्योगामुळे कृषी उत्पादनांना थेट मूल्यवर्धन येते उदाहरणार्थ कच्चा टोमॅटो विकण्याऐवजी त्यापासून टोमॅटो सॉस तयार करून विकल्यास अधिक नफा मिळू शकतो अशा प्रकारे स्थानिक पातळीवर उत्पादन आणि विक्री ची साखळी निर्माण होते यामुळे स्थानिक रोजगार निर्मिती वाढते महिला सक्षमीकरणाला चालना मिळते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते स्थलांतराचे प्रमाण कमी होते

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

  1. प्रश्न : योजनेसाठी किमान वय किती आहे साधारणता अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे
  2. प्रश्न : 10 लाखापेक्षा जास्त प्रकल्प असल्यास काय? अनुदानाची मर्यादा लाखांपर्यंत आहे उर्वरित रक्कम कर्ज किंवा स्वतःच्या गुंतवणुकीतून भागवावी लागते
  3. प्रश्न : महिला उद्योजकांना विशेष सवलती आहे का? महिला स्वयंसहायता गटांना प्राधान्य दिले जाते आणि प्रशिक्षण व मार्गदर्शक विशेष लक्ष दिले जाते
  4. प्रश्न : प्रशिक्षण दिले जाते का होय? आवश्यकतेनुसार कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे

निष्कर्ष स्वावलंबाकडे ठाम पाऊल

FMFME योजना ही ग्रामीण भागातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांसाठीही एक परिवर्तनकारी उपक्रम ठरत आहे 35 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान आणि 10 लाख रुपयांची आर्थिक मदत यामुळे उद्योग सुरू करण्याचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे जर तुम्ही बेरोजगार युवक महिला गट सदस्य किंवा शेतकरी उत्पादन असाल तर ही योजना तुमच्यासाठी संधी ठरू शकते आजच आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा आणि स्वावलंबी उद्योजकतेच्या दिशेने पहिले पाऊल टाका धन्यवाद

टीप माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर नक्की करा अशाच उपयोगी माहितीसाठी नोटिफिकेशन All करून टाका- जेणेकरून प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल

Leave a Comment