महाराष्ट्रातील दिव्यांग बांधावं करिता राज्य शासनाकडून एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे सिंगल विंडो डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले असून या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजना लाभ एकाच ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने घेता येईल या लेखामध्ये आपण Divyang Sahayak Portal Information पोर्टल महाराष्ट्र नोंदणी प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे उपलब्ध योजना आणि पोर्टल चे फायदे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय?
दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना सेवा आणि आर्थिक सहाय्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आहे ही प्रणाली Single Window System प्रामाणिक कार्यकर्ते म्हणजेच एकदाच नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्यांना अनेक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही
पोर्टलचे चे उद्घाटन
या पोर्टलचे उद्घाटन राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री अतुल साळवे तसेच सचिव तुकाराम मुंढे यांची उपस्थिती होती या पोर्टल मुळे दिव्यांगांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे
कोणकोणत्या योजना उपलब्ध आहे
सध्या या पोर्टलवर एकूण 14 प्रकारच्या शासकीय योजना असून समाविष्ट करण्यात आल्या आहेत पुढील काळामध्ये अनेक योजना जोडला जाण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे
या योजनेमध्ये प्रामुख्याने :
- आर्थिक सहाय्य योजना
- व्यवसाय सहाय्यक
- शैक्षणिक मदत
- उपकरण वितरण योजना
- वैद्यकीय सहाय्य योजना
इत्यादीचा समावेश आहे
किती लोकांची नोंदणी आधीच लिंक आहे
या पोर्टलवर सुमारे 13.84 लाख युडीआयडी (UDID) कार्ड धारकांची माहिती लिंक करण्यात आली आहे म्हणजे ज्यांच्याकडे UDID (Unique Disability ID) कार्ड आहे यांची माहिती प्रणालीमध्ये आधीच समाविष्ट करण्यात आली आहे परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र स्वतःची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे
how to apply for divyang sahayak portal maharashtra online registration
आता आपण अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया
सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या : गुगल वर असे सर्च करा किंवा अधिकृत लिंक वर क्लिक करा
नोंदणी : दिव्यांग व्यक्ती साठी पर्याय निवडा एकदाच नोंदणी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा UDID क्रमांक टाका आपला UDID कार्ड क्रमांका समाविष्ट करून ओटीपी द्वारे पातळणी पातळणी करा मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो टाकून पाताळणी पूर्ण करून
वैयक्तिक माहिती भरा: नाव पत्ता आधार तपशील अपंगत्वाचा प्रकार बँक खात्याची माहिती ही सर्व माहिती अचूक भरा
कागदपत्रे अपलोड करा : UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो
अर्ज सबमिट करा : सर्व माहिती तपासून सबमिट बटणावर क्लिक करा
नोंदणी केल्यानंतर काय?
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही उपलब्ध योजनेची यादी पाहू शकता पात्रतेनुसार अर्ज करू शकता अर्ज करण्याची स्थिती ट्रॅक करू शकता शासनाच्या नवीन अपडेट तुम्हाला पाहता येईल
पोर्टल चे वैशिष्ट्ये
सिंगल विंडो सिस्टम एकाच नोंदणी द्वारे अनेक योजनेचा लाभ पारदर्शकता डिजिटल पातळणी प्रक्रिया पारदर्शक वेळेची बचत शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज नाही ऑनलाइन स्टेटस ट्रेडिंग आजची स्थिती घरी बसून पाहता येईल
कोण अर्ज करू शकतो
महाराष्ट्रातील रहिवासी वैद्य UDID कार्डधारक शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेनुसार दिव्यांग व्यक्ती
आवश्यक कागदपत्रे
- UDID आयडी कार्ड
- आधार कार्ड
- बँक खात्याचे तपशील
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड (लागू असल्यास)
महत्त्वाच्या सूचना
नोंदणी एकदाच करावी मोबाईल नंबर UDID शी-लिंक असावा चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो अधिकृत वेबसाईट वरच अर्ज करावा
दिव्यांग करिता डिजिटल क्रांती
दिव्यांग सहाय्यक पोटले महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहेत या माध्यमातून नागरिकांना सामान्य आणि सुलभ पद्धतीने शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे पूर्वी विविध योजनेसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागत होते आता मात्र एकाच पोर्टलवर सर्व सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वेळ पैसा आणि श्रम याची देखील बचत होणार आहे माहिती पूर्णपणे आवडल्यास आपल्या येणाऱ्या नोटिफिकेशन ला All करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन माहितीसह नोटिफिकेशन मिळत राहतील
निष्कर्ष. How to Apply for Divyang Sahayak Portal Maharashtra पोर्टल या मार्गदर्शक लेखामध्ये आपण नोंदणी प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आणि पोर्टल चे फायदे सविस्तर जाणून घेतले आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर या पोर्टल ची माहिती नक्की नोंदणी करा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्या ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून राज्यातील एकही पात्र लाभार्थी या माहितीपासून किंवा योजनेपासून वंचित राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र





