gharkul yojana maharashtra 2026 |सर्वच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, हप्ता येणार खात्यात

महाराष्ट्र राज्यातील विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय राज्य शासनाने पासून प्रलंबित अनुदान वितरण यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे

राज्यात केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी या प्रमुख योजना राबवल्या जात आहे याशिवाय राज्यातील राज्य शासनाच्या माध्यमातून शहरी आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंत घरकुल योजना तसेच मोदी घरकुल योजना अशा विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल गरजू कुटुंबांना घरकुलांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते

gharkul yojana maharashtra या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित होते विशेषता 2022 पासून यशवंत घरकुल योजनेतील अनेक लाभार्थी अनुदानाच्या या प्रतीक्षेत होते राज्य शासनाने अलीकडेच प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेत आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे शबरी आवास योजना ग्रामीण व शहरी या दोन्ही कामांसाठी अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली आहे तसेच आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमाती तील घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी ही निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे

बहुजन कल्याण विभागामार्फत ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजने साठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच बरोबर सर्वसाधारण ओपन प्रवर्ग पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल हात्यासाठी आवश्यक निधी वितरित प्रक्रियेला गती देण्यात आली आहे 24 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने संबंधित विभागांना निधी वितरीत करण्यास मंजुरी दिल्यामुळे आता प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

घरकुल योजनेअंतर्गत वाढीव 50,000 रुपयाच्या अनुदानात बाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी 35 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात साठी शासनाने तरतूद केली आहे यामुळे बांधकाम पूर्ण करण्यासाठी किंवा अपूर्ण राहिले कामांना गती देण्यासाठी लाभार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे सध्या अनेक लाभार्थ्यांचे एफटीओ (Fund Transfer Order जनरेट यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे काही लाभार्थ्यांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळत आहे ज्या लाभार्थ्यांचे दुसरे किंवा तिसरे आपत्य प्रलंबित आहेत

तसेच वाढीव अनुदानाची प्रतीक्षा आहे त्यांनाही लवकरच रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात (Direct Benefit Transfer ) प्रणाली द्वारे जमा होणार आहे या सर्व निधी वितरणाबाबत चे अधिकृत शासन निर्णय जीआर (GR) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे संबंधित लाभार्थ्यांनी वेळेवर आपल्या ग्रामपंचायत नगर परिषद किंवा नगरपालिकेचे संपर्क ठेवावा तसेच अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी असे आवाहन करण्यात येत आहे एकंदरीत पाहता राज्यातील जवळपास सर्व प्रमुख घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे अशा प्रतिक्षे ला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे

घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे अडकलेली कामे आता पुन्हा वेगाने सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशा या निर्णयामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

Leave a Comment