ई पीक पाहणी ची अंतिम तारीख जवळ आली आहे : रब्बी पिकांची नोंद झाली का?

रब्बी हंगामामध्ये ई पीक पाहणी साठी दिलेली अंतिम मुदत जवळ येत असून अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची नोंदणी केलेली नसून सातबारा उताऱ्यावर पीक नोंद न झाल्यास पीक विमा नुकसान भरपाई तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही असा स्पष्ट इशारा शासनाकडून देण्यात येत आहे शासनाच्या रब्बी हंगामाच्या महत्वकांक्षी ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे उपक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरू झालेली आहे

परंतु राज्यात प्रत्यक्ष नोंदणीचा वेग अपेक्षे इतका नसल्याचे चित्र आहे दिनांक 10 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी स्वतःच्या 7/12 उताऱ्यावर पिकांची नोंद अँड्रॉइड मोबाईल द्वारे करणे खूप बंधनकारक आहे मात्र 26 जानेवारी 20!26 ही रब्बी पिकाची नोंदणी करण्याची अंतिम मुदत जवळ येऊनही मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असून नोंदणी बाहेर असल्याचे प्रशासनाची चिंता वाढली आहे

ई पीक पाहणी नोंदणी आवश्यक ई पीक पाहणी साठी DCS VERSION 4.0.5 अँड्रॉइड मोबाईल वर इन्स्टॉल करणे आवश्यक असून गुगल क्रोम अद्यावत करून शेतातील बांधावर प्रत्यक्ष जाऊन तुम्ही E Peek pahani नोंदणी करून माहिती अपलोड करणे खूप महत्त्वाचे आहे मात्र अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनचा अभाव इंटरनेट समस्या किंवा ॲप हाताळण्यात यातील अडचणी दिसून येत आहे अशा परिस्थितीमुळे तलाठी कोतवाल कॉमन सर्विस सेंटर सीएससी तसेच गाव निहाय नियुक्त सहाय्यकाची मदत घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

E Peek Pahani का महत्वाचे असते

  • पीक सातबारा उताऱ्यावर अधिकृत पीक नोंद सुनिश्चित होते
  • त्यानंतर पिक विमा व नुकसान पासून करिता आधार मिळतो
  • कृषी योजनांचा लाभ सुलभ होताना दिसतो
  • नैसर्गिक आपत्ती वेळीच मदतीची प्रक्रिया जलद प्रकारे होते

ई पीक पाहणी न केल्यास काय नुकसान होणार

ई पीक पाहणी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून ती शेतकऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची भेट जोडलेली आहे जर सातबारा उताऱ्यावर ही नोंद झाली नाही तर संबंधित पिक पेरा कोरा राहतो आणि तो नंतर भरता येत नसून परिणाम तुम्हाला पिक विमा नैसर्गिक आपत्ती तील नुकसान भरपाई अशा विविध शासकीय अनुदानाचे व योजनेचा लाभ मिळणे खूप कठीण होईल अवकाळी पाऊस गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचूक पीक नोंद हीच शेतकऱ्यांची मोठी डाल ठरते

Leave a Comment