दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना संपूर्ण माहिती एका पोर्टलवर मित्रांनो राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेबाबत अनेकदा माहिती नसते अलीकडेच शॉप ऑन व्हीकल या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर अनेक नागरिकांनी दिव्यांग योजनेसाठी साठी अर्ज कसा करायचा कोणते पोर्टल आहे कोण कोणत्या योजना उपलब्ध आहेत आणि अर्जाची स्थिती कशी तपासायची याबाबत मोठ्या विचारणा केली होती या प्रश्नावर ती उत्तरे देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त विकास महामंडळ (MSHFDC) स्थापन केले आहे
याच महामंडळाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या सर्व योजना राबवल्या जातात महामंडळाचे अधिकृत पोर्टल म्हणजेच mshfdc.co.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला महामंडळाची संपूर्ण माहिती विविध योजना त्या संबंधित शासकीय निर्णय (GR) अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्राची सविस्तर माहिती मिळते
पोर्टलवर उपलब्ध प्रमुख योजना
या पोर्टल वरती योजना व सुविधा हा एक स्वतंत्र टॅब देण्यात आलेला आहे त्यामध्ये महामंडळाच्या विविध कर्ज योजना आणि शासनाच्या अनुदान योजना पाहायला मिळतात
त्यामध्ये प्रामुख्याने पुढील योजना समाविष्ट आहेत :
- वैयक्तिक थेट कर्ज योजना
- मुदत कर्ज योजना
- महिला समृद्धी योजना
- कृषी संजीवनी योजना (शेतकऱ्यांसाठी) मोबाईल शॉप ऑन व्हीकल योजना
- रमाई घरकुल आवास योजना
- वाहन खरेदीसाठी कर्ज योजना
- दिव्यांगांसाठी साहित्य व साधन सामग्री योजना
प्रत्येक योजनेअंतर्गत कर्ज किती मिळते लाभार्थ्यांचा हिस्सा किती असतो, शासनाकडून किती अनुदान दिले जात कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती आपण येथे दिलेली आहे
पात्रता अटी
बहुतेक योजनेसाठी काही सामान्यातून अटी लागू होतात तसे की
- अर्जदार किमान 40 टक्के दिव्यांग असावा
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- वयाची अट
- 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे
- उत्पन्न मर्यादा योजनेनुसार बदलते ही सर्व माहिती स्पष्टपणे नमूद केलेली आहे
अर्ज कसा करायचा आणि स्थिती कशी तपासायची
नवीन योजना सुरू केली जाते तेव्हा त्या संदर्भातील नोटिफिकेशन आणि ऑनलाईन अर्ज लिंक या पोर्टलवर दिली जाते उदाहरणार्थ शॉप ऑन व्हीकल यासाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन पोर्टल देण्यात आले होते ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये अर्ज क्रमांक टाकून आपल्या स्थिती पाहू शकता
- Pending अर्ज प्रलंबित आहे
- Approved अर्ज मंजूर झाला आहे
- rejected अर्ज नाकारण्यात आला आहे
- waiting List प्रतीक्षा यादीत आहे
त्यामुळे लाभार्थ्यांना आपल्या अर्जाची स्थिती घरबसल्या कळू शकते
लाभार्थी यादी ( Beneficial List)
प्रत्येक आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाते सध्या 2023-24 वर्षाची यादी प्रकाश झाली आहे तर 2024-25 वर्षाची प्रक्रिया सुरू आहे त्या यादीत जिल्हानिहाय लाभार्थ्यांची नावे येतात
- उदाहरणार्थ अमरावती जिल्ह्यात 17 लाभार्थी पात्र
- पुणे जिल्ह्यात 52 लाभार्थी पात्र
अशाप्रकारे प्रत्येक जिल्ह्याची स्वातंत्र्य यादी उपलब्ध आहे
निधी वितरणाची माहिती शॉप ऑन व्हीकल योजनेसाठी अलीकडेच सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ दिला जात आहे जुन्या मंजूर अर्जा बरोबरच नव्या अर्जाची प्रक्रिया देखील सुरू आहे
निष्कर्ष : मित्रांनो दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अनेक महत्त्वाच्या योजना महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व वित्त विकास महामंडळाच्या धरतीवर राबवल्या जातात नवीन निधी वितरण शासन निर्णय अर्ज या आणि लाभार्थी यादी याबाबतची सर्व अधिकृत माहिती याच वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट केली जाते जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी दिव्यांग असाल तर या पोर्टलवर नियमित भेट देणे अत्यंत उपयुक्त ठरेल यामुळे कोणतीही योजना चुकणार नाही आणि वेळेत अर्ज करता येईल अशाच नवीन योजना शासन निर्णय आणि महत्त्वाच्या अपडेट साठी आमच्या वेबसाईटला जोडून राहा





