दिव्यांग बांधवांसाठी अपडेट मोबाईल शॉप ऑन व्हीकल योजनेसाठी 25 कोटीचा निधी मंजूर

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मोफत फिरते वाहन दुकान देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या संदर्भातील महत्वपूर्ण शासन निर्णय (जीआर) दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे हा निधी महाराष्ट्र राज्य दिव्यांग व विकास महामंडळ मर्यादित यांना 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रदान करण्यात आला असून या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वाहनाचे वितरण करण्यात येणार आहे

मोबाईल शॉप ऑन व्हीकल योजना म्हणजे काय

मोबाईल शॉप ऑन व्हीकल योजना दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत हरित ऊर्जावर चालणारे फिरती वाहन दुकान मोबाईल शॉप पूर्ण 100 टक्के अनुदानावर दिले जाते या वाहनाच्या माध्यमातून लाभार्थी विविध वस्तूंची विक्री करू शकतात जसे की किराणा सामान, भाजीपाला फळे, छोटे व्यवसायिक उत्पादने

यामुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मोठी मदत होणार आहे

अर्ज प्रक्रिया आणि निधी वितरणाची माहिती

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या होती त्यावेळी अनेक दिव्यांग बांधवांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले होते पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी या आभावी वितरण रखडले होती आता शासनाने नवीन निर्णयानुसार या योजनेसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरण केले जाईल मोबाईल शॉप ऑन व्हीकलचे वितरण सुरू होईल त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षा नंतर असलेल्या दिव्यांग बांधवांना लवकरच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे

शासन निर्णयाची अधिकृत माहिती कुठे पहावी

या योजनेशी संबंधित सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे gr.maharashtra.gov.in येथे तुम्ही दिनांक 3 फेब्रुवारी 2026 चा जीआर पाहू शकता आणि त्यामधील निधी मंजुरीची इतर माहिती वाचू शकता

दिव्यांगांसाठी स्वावलंबन चा नवा मार्ग

मोबाईल शॉप ऑन व्हीकल योजना ही केवळ आर्थिक मदत नसून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्मलकडे नेण्याचा दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे मोफत वाहन आणि व्यवसायाची संधी मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना स्थिर उत्पादनाचा स्रोत मिळणार आहे राज्य शासनाचा हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून भविष्यात आणखीन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता खूपच आहे

निष्कर्ष. दिव्यांग बांधवांना करिता मोबाईल शॉप ओन व्हीकल योजनेसाठी 25 कोटीचा निधी मंजूर होणे हे अत्यंत सकारात्मक असून ते परळी 2025 मध्ये अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच वाहनाचे वितरण सुरू होणार असून त्यातून त्यांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळणार आहे राज्य शासनाचा हा निर्णय हजारो दिव्यांग नागरिकांच्या जीवनामध्ये नवा आशेचा किरण ठरवून येणार आहे

Leave a Comment