मेंढपाळांना 7.33 कोटींच्या अनुदानाचे वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील भटक्या जमातीतील ध्वज (भज-क) धनगर व तत्सम समाजातील 3054 मेंढपाळांना सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी7.33 कोटी रुपयाचे चराई अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे पावसाळ्यात मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्यांसाठी चारा मिळवताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे अनुदान देण्यात आले आहे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले
की या आर्थिक साह्यामुळे मेंढपाळांच्या उत्पन्नात आले असून त्यांचे जीवन मान सुधारण्यास हातभार लागेल पावसाळी काळात मेंढपाळ आपल्या मूळ गावी परतल्यानंतर चाऱ्याची टंचाई भासते त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होतो आणि उत्पादन क्षमता कमी होते या पार्श्वभूमीवर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी प्रत्येकी महिन्याला 6 हजार रुपये अशा एकूण 24 हजार रुपयांचे अनुदान पात्र मेंढपाळांना देण्यात आले आहे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते
लॉटरी प्रणालीमध्ये लॉटरी प्रणालीद्वारे संगणकीय पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात आली जिल्हा निहाय व तालुका तालुका निहाय उद्दिष्ट ठरवून पात्रतेच्या आधारे लाभार्थ्यांची निवड झाली महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शीतलकुमार मुकणे यांनी सांगितले की या योजनेचा थेट लाभ मिळाल्याने मेंढपाळांच्या चाऱ्याची गरज भागली असून त्यांचा मेंढ्याच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात आल्याने पारदर्शकता आणि कार्यक्षमता दोन्ही वाढल्या वाढली आहे पशुसंवर्धन विभाग आणि इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे