अवकाळी पाऊस व उष्णतेमुळे नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 12.38 कोटीची मदत शासनाचा महत्त्वपूर्ण GR जारी

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आर्थिक मदत दिली जाते आणि पाऊस गारपीट सततचा पाऊस दुष्काळ तसेच तापमान वाढ यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशाच एका महत्वपूर्ण निर्णयात मे 2025 मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट तसेच जून 2025 मध्ये मुर्ग बहाराच्या कालावधीत पावसाचा खंड व 40 अंशपेक्षा जास्त तापमानामुळे नुकसान झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यात राज्य शासनाने मंजुरी दिली आहे या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जीआर दिनांक 6/ जानेवारी/ 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून याचा थेट लाभ वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे

वर्धा जिल्ह्यातील 8999 शेतकऱ्यांना थेट लाभ

या शासन निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यातील आर्वी आष्टी आणि करांजा या तीन तालुक्यातील एकूण 16 महसूल मंडळांमधील 8999 शेतकऱ्यांना सुमारे 12 कोटी 38 लाख 91 हजार 300 रुपये इतकी नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ही मदत विशेष बाब म्हणून देण्यात येणार असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कोणत्या तालुक्यांना व महसूल मंडळांना लाभ

आर्वी तालुका

आर्वी तालुक्यातील खालील 7 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे

  • खरांगणा
  • विरोळ
  • दाऊतपुर
  • आर्वी
  • वाटोडा
  • वाढोणा
  • रोहना

आष्टी तालुका

आष्टी तालुक्यातील 4 महसूल मंडळे

  • आष्टी
  • अंतोरा
  • साहुरा
  • तळेगाव

कारंजा तालुका

कारंजा तालुक्यातील 5 महसूल मंडळ

  • कारंजा
  • सारवाडी
  • ठाणे गाव
  • कन्नमवार ग्राम
  • दाबा

या तीन तालुक्यांमधील मिळून 8999 शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत थेट वितरित केली जाणार आहे

याचे प्रमुख कारण काय होते

मे 2025 मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट आणि जून 2025 मध्ये बहाराच्या कालावधीत पावसाचा खंड तसेच 40 अंशपेक्षा जास्त तापमान यामुळे संत्रा पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला फळ उत्पादन गट आणि झाडांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते ही परिस्थिती लक्षात घेता स्थानिक पातळीवरून विशेष बाब म्हणून मदत देण्याची परवानगी करण्यात आली होती या शासनाने मान्यता दिली आहे

पिक विमासाठीही होणार मदत

महत्त्वाची बाब म्हणजे या निकषावर आधारित संत्रा पिकांचा फळ पीक विमा मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळण्याची शक्यता आहे

जीआर कुठे पाहता येईल हा महत्वाचा शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in वर पाहू शकता

Leave a Comment