अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी रब्बी अनुदान वितरणाला सुरुवात | महत्त्वाचा अपडेट

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या रब्बी हंगामाच्या अनुदानाचे वितरण अखेर सुरुवात झाले आहे खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती राज्यशासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्‍टरी 10 हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली होती

यामध्ये अनेक शेतकऱ्यांना यापूर्वीच अनुदानाचे पैसे मिळाले होते मात्र बऱ्याच जिल्ह्यामधील शेतकरी अनुदान अजूनही या मदतीच्या प्रतीक्षेत होते आता अखेर या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना रब्बी अनुदान वितरण आला सुरुवात झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे

माहितीनुसार राज्यातील एकूण 282 तालुके हे अशांत आणि पूर्ववत: अतिवृष्टीने बाधित घोषित करण्यात आले आहे या तालुक्यामधील महसूल मंडळ तसेच सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा समावेश करण्यात आला आहे विशेषता कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता त्यामुळे मागील भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे अनुदान वाटप करण्यात आले होते

22 जानेवारीपासून काही ठिकाणी अतिवृष्टीच्या उर्वरित नुकसान भरपाईचे वितरण सुरू झाले होते त्याचबरोबर ज्यांना यापूर्वी अनुदानाचे पैसे मिळाले होते पण रब्बी अनुदान बाकी होते अशा शेतकऱ्या खात्यात आता रब्बी अनुदानही जमा होऊ लागले आहे अनुदानाची रक्कम नुकसान झालेल्या क्षेत्राच्या प्रमाणावर आधारित देण्यात येत आहे जर एखादा शेतकऱ्याचे एक हेक्टर क्षेत्र बाधित चे नोंदवले गेले असेल तर त्या शेतकऱ्याला 10 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचप्रमाणे जर 50 आर क्षेत्र नुकसानग्रस्त दाखवण्यात आले असेल तर त्या शेतकऱ्याला 5 हजार रुपये मिळणार आहे

म्हणजेच दाखवलेल्या बाधित क्षेत्र थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले जात आहे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे की पात्र सर्व शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात लवकरात लवकर ही रक्कम जमा करण्यात येईल यासाठी थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीचा वापर केला जात आहे अनुदान जमा होताच शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएसद्वारे ( SMS) माहिती मिळणार आहे ही मदत शेतकऱ्यांना पुढील कामासाठी पुन्हा शेती उभी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे

बियाणे खाते मशागत आणि इतर शेती कामांसाठी हे अनुदान मोठा आधार ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे त्या शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नसेल त्यांनी आपल्या तालुका कृषी कार्यालयात किंवा महसूल विभागाशी संपर्क साधावा तसेच बँक खात्याची माहिती योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी राज्यात लाखो शेतकऱ्यांना हा निर्णय महत्वाचा असून शासनाच्या या मदतीमुळे आणि कुटुंबांना दिलासा मिळणार आहे

Leave a Comment