शासनाच्या कृषी विभागाद्वारे शेतकर्यांकरिता एक नवीन ॲप सुरू करण्यात आले असून या शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणून ओळखले जाते आता शेतकरी बांधवांना एक ह्या एका ॲप मध्ये शेती विषयक सर्व योजना आणि माहिती उपलब्ध आहे या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामाना संबंधित माहिती तसेच पीक सल्ला पिकासाठी लागणाऱ्या हवामान खात्याच्या अंदाज कीड आणि रोगाविषयी माहिती त्याच बरोबर बाजार भाव पाहण्यासाठी सुविधा मिळणार आहे या ॲपवर एका क्लिकवर शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर मिळण्यासाठी त्याच्या गावाच्या जवळपास असलेल्या अवजारे बँकेची माहिती देखील उपलब्ध करून देणे आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि महाडीबीटी उपलब्ध असणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती घटकांकरिता अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे कोणती व त्याची माहिती या ॲप मध्ये आहे ऑनलाइन शेती क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानावरील व्हिडिओ या ॲपच्या माध्यमातून पाहता येतील अशा अनेक सेवा या मोबाईल ॲप मध्ये दिल्या आहेत
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शंकाचे होणार निरासन
शेतकरी बांधवांनी प्ले वरून महाविस्तार ॲप डाऊनलोड करावे नंतर आपल्या शेतकरी आयडीने लॉग इन करून ते नाव गाव आणि तालुका प्रविष्ट करावे त्यामुळे त्यांना आणि गाव निहाय आणि तालुकानिहाय सर्व माहिती उपलब्ध होणार आहे ॲपच्या होमपेजवर शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळेल तसेच नव्या गोष्टी विषयी विचारणा किंवा शेतकरी बांधवांचे मनात निर्माण होणाऱ्या शंका आणि प्रश्न याची ॲप मधील प्रश्न विचारा या विभागात करू शकतात आणि निराकारण मिळू शकतात
कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधा
याप्रकारे शेतकऱ्यांना त्याच्या शेती विषय सोबती आणि मित्र याच्या मोबाईल मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा आणि याबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे