महाराष्ट्रातील निराधार दिव्यांग विधवा महिला ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींसाठी राज्य शासन विविध सामाजिक सुरक्षा योजना राबवत आहे त्यापैकी महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेतील लाभार्थ्यांना केवळ पेन्शनस नव्हे तर अन्नसुरक्षाचा ही अधिकार आहे शासनाच्या नियमानुसार अशा लाभार्थ्यांना स्वस्त शिधापत्रिका (रेशन कार्ड) आणि त्यावर योग्य प्रमाणात धान्य मिळवणे बंधनकारक आहे अनेक वेळा लाभार्थ्यांना कडे रेशन कार्ड असते परंतु त्यावर धान्य मिळत नाही किंवा हा अत्यल्प प्रमाणात मिळते काहींना शिधापत्रिका मिळते परंतु त्यामध्ये मिळणारे 4 ते 5 किलो धान्य दिले जाते ते कुटुंबासाठी अपुरे ठरते अशा वेळी आत्योदय शिधा पत्रिका चा लाभ मिळवणे अत्यंत गरजेचे असते
अत्योदय शिधापत्रिका म्हणजे काय ?
Antyodaya Ration Card शिधा पत्रिका अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 30 ते 35 किलोपर्यंत धान्य सवलतीच्या दरात मिळते निराधार व्यक्ती दिव्यांग विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी मदत ठरते परंतु प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात विविध कारणे देऊन नाकार दिला जातो अधिकाऱ्याकडून दिली जाणारी दोन प्रमुख कारणे शिल्लक नाही अनेक ठिकाणी अधिकारी कडून सांगितले जाते की विषेश्टा धान्यकोठार उपलब्ध नाही त्यामुळे अत्योदय मध्ये रुपांतर करता येणार नाही परंतु ही भूमिका चुकीची आहे राज्य शासनाने काही महिन्यापूर्वी सर्व रेशन कार्डची KYC प्रक्रिया केली आहे अनेक अपात्र रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे कोटा शिल्लक नाही हा युक्ती ग्राह्य धरला जाऊ शकतो शकत नाही
15000 उत्पन्नाचा दाखला आवश्यक
दुसरे कारण असे सांगितले जाते की आत्योदय शिधापत्रिका साठी पंधरा हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे परंतु संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी हे मुळातच उत्पन्न विहित किंवा अत्यल्प उत्पन्न असलेल्या असतात त्यांना मिळणारी पेन्शन ही उत्पन्न मानली जाते त्यामुळे उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक नाही
National Food Security Act 2013 अंतर्गत महत्त्वाची तरतूद
अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळणार कायदेशीर अधिकार आहे या अधिनियमात स्पष्टपणे नमूद आहे की उत्पन्नाचा दाखला अनिवार्य नसून शासनाने दिलेले हमीपत्र (Declaration/Undertaking) सादर करणे पुरेसे आहे म्हणजेच रेशन कार्ड वर धान्य सुरू करण्यासाठी किंवा आत्यादय यांमध्ये रूपांतर करण्यासाठी उत्पादन उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही फक्त आम्ही पत्र भरुन सादर करणे आवश्यक आहे
हमीपत्र कसे भरावे
हमीपत्र भरताना खालील माहिती लिहावी
- पूर्ण नाव इंग्रजी
- संपूर्ण पत्ता
- वार्षिक उत्पन्न 15 हजार रुपये (अक्षरी व आकड्यात)
- कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे व लिंक
- आधार क्रमांक
- कुटुंब प्रमुखाची सही
- दिनांक
- एक फोटो
हमीपत्र सोबत जोडण्याचे कागदपत्र
- सर्व सदस्यांच्या आधार कार्ड झेरॉक्स
- जुनी शिधापत्रिका झेरॉक्स
- भरलेले हमीपत्र
ही सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केल्यास अर्ज प्रक्रिया साठी स्वीकारला जातो
महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
- पेन्शन म्हणजे उत्पन्न नाही
- उत्पन्नाचा दाखला बंधनकारक नाही
- हमीपत्र पुरेशी आहे
- हमीपत्र आत्यादय रूपांतर हा तुमचा हक्क आहे
उत्पन्नाचा दाखला का आवश्यक नाही
संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी हे शासनाने निराधार म्हणून मान्य केलेले असतात त्याच्याकडे स्थिर उत्पन्नाचे साधन नसते पेन्शन ही केवळ सहाय्यक रक्कम आहे ती उत्पन्न मानली जात नाही त्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र मागणी हे कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही जर अधिकारी उत्पन्नाचा दाखला मागत असतील तर लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाचा उल्लेख करून हमीपत्र सादर करण्याचा आग्रह दारवा
समाधान शिबिरामध्ये काय करावे
राज्य शासनाकडून समाधान शिबिर आयोजित केले जातात या शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जाते अशा शिबिरामध्ये लाभार्थ्यांनी
- हमीपत्र अर्ज सादर करावा
- आत्योदय मध्ये स्वरूपाची मागणी करावी
- नकार दिल्यास लेखी कारणे मागावी
- आपण कायदेशीर हक्क ठामपणे मांडणे आवश्यक आहे
धान्याचा कोठा शिल्लक नाही असल्यास काय करावे
जर वारंवार कोटा नाही असे सांगितले जात असेल तर माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत अर्ज करून संबंधित कार्यालयाकडून खालील माहिती मागावीअनेक वेळा माहितीचा अधिकार अर्ज केल्यानंतर काम लवकर होते असा अनुभव आहे
निष्कर्ष संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना स्वतंत्र रेशन कार्ड आणि योग्य प्रमाणात धान्य मिळणे हा त्याचा कायदेशीर अधिकार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार फक्त हमीपत्र भरून दिले तरी धान्य मिळू शकते उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक नाही म्हणून कोणतेही चुकीच्या कारणामुळे घाबरून नका शासनाचा नियम समजून घ्या योग्य कागदपत्रांसह अर्ज सादर करा आणि आपला हक्क मिळवा प्रत्येक निराधार व्यक्तीला पुरेसे धान्य मिळालेच पाहिजे हीच खरी सामाजिक न्यायची अंमलबजावणी आहे





