PM Kisan Yojana:केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये पैसे दिले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.दरम्यान, आता पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांनो ३० एप्रिलआधी हे काम कराच (Farmers Have to do These Work Before 30th April)
पीएम किसान योजनेचा लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे काम करायचे आहे. ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे, केवायसी पूर्ण नसल्याने आणि कागदपत्र पूर्तता नसल्याने योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना एक महत्त्वाचे काम करायचे आहे.
ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना आपल्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहे. ३० तारखेपर्यंत नावनोंदणी केलेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. ३० एप्रिलआधी त्यांनी हे काम करायचे आगे. त्यांच्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करायच्या आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिलनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार नाही.योजनेच्या वेबसाइटवर कोणतेही कागदपत्र अपलोड करु शकणार नाही. याचसोबत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले त्यांना योजनेतून वगळले जाईल. याबाबत टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या अर्जात काही त्रुटी असतील त्यांनी लवकरात लवकर त्या दूर करायच्या आहेत. शेवटचे २ दिवस उरले आहेत. तोपर्यंत अपडेटेड कागदपत्रदेखील अपलोड करा, असं आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता हे काम करायचे आहे.






