तुमच्या घरात टीव्ही, वाहन, मोबाइल आहे का?, जनगणनेत विचारले जाणार ३४ प्रश्न. Bhartiya Janagana 2027

Bhartiya Janagana 2027:जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आगामी १ मेपासून सुरुवात होत असून, यामध्ये नागरिकांना आपल्या घरातील विविध सुविधांची माहिती द्यावी लागणार आहे. यात तुमच्या घरात टीव्ही, वाहन, मोबाइल, संगणक आहे का यासह इतर माहिती जनगणेत नोंद होणार आहे.

दि. १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना पोर्टलवर स्वतः माहिती भरता येणार आहे. नागरिकांना याप्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून ऑनलाइन स्व-गणना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची उपस्थिती होती. यावेळच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दि. १ मेपासून सुरू होणाऱ्या याप्रक्रियेत नागरिकांना स्वतः माहिती भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर प्रगणक घरोघरी जाऊन उर्वरित माहिती संकलित करणार आहेत.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व इतर.

पुढील वर्षी दुसरा टप्पा

जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७पासून सुरू होईल. यात लोकसंख्येची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

16 मध्ये

ते २४ जून या कालावधीमध्ये प्रगणक घरोघरी जाऊन माहिती नागरिकांची माहिती गोळा करणार आहेत.

जिल्हाधिकारी

माहिती भरल्यानंतर एक युनिक आयडी तयार होणार

नागरिकांना नोंदणी करण्यासाठी

www.se.census.gov.in हे पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. नागरिकांनी माहिती भरल्यानंतर एक युनिक आयडी तयार होणार आहे. ज्या नागरिकांनी स्वतः गणना केली आहे अशा नागरिकांना प्रगणक घरी आल्यानंतर युनिक आयडी क्रमांक सादर करावा लागणार आहे. दि. १६ मे ते २४ जूनपर्यंत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना ही फेब्रुवारी २०२७मध्ये पार पडणार आहे

१५ मेनंतर प्रगणकाकडून घरोघरी जाऊन नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून ३,१०० प्रगणकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

तर ५१९ पर्यवेक्षक व ६१ फिल्ड टेनर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील २,८१८ गटांमध्ये जनगणेची प्रक्रिया पार पडेल. जनगणेसाठी महानगरपालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

यामुळे अधिकारी-कर्मचान्यांची नेमणूक मनपाकडूनच करण्यात येणार आहे. मनपा व्यतिरिक्त भागासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम चालणार आहे.

भारताची जनगणना 2027

जनगणनेद्वारे सार्वजनिक कल्याण

कुटुंबातील भौतिक सुविधाविषयी प्रश्न

प्रामुख्याने घरांची सूचिबद्धता जनगणनेच्या या पहिल्या टप्प्यात आणि कुटुंबातील सुविधांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये नागरिकांकडे कोणत्या सुविधा आहेत, यावर ३४ प्रश्न विचारले जाणार आहेत.

यात टीव्ही, मोबाइल, संगणक, वाहन, कुटुंबाचे वेतनासह शौचालयाची उपलब्धता, प्रकाशाचा स्त्रोत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सांडपाणी, स्वयंपाकाचे इंधन यासह इतर प्रश्नाची उत्तरे नागरिकांना द्यावी लागणार आहेत.

तसेच कुटुंब प्रमुखाचे नाव, जातीचा प्रवर्ग, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंबातील विवाहित जोडपे, घरातील खोल्या, घराच्या मालकी हक्काची माहिती नोंदवावी लागणार आहे.

सध्या वास्तव्यास आहेत. तेथील : भाडेकरूनसाठी ते ज्या ठिकाणी माहिती पोर्टलवर किंवा प्रगणकास द्यावी लागणार आहे. नोंदणी करतांना तसा पर्याय शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Leave a Comment