राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर येत असून राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या अतिरिक्त 50 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे या अनुदानाचे वितरण आता टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू झालेले आहे त्यामुळे अनेक लाभार्थ्यांकडून पात्र आहोत का नही ? असा प्रश्न देखील उद्भवतो आहे हे लेखामध्ये आपण वाढीव 50,000 रुपयांचे अनुदान बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पात्रता कोणत्या योजना लाभार्थ्यांना मिळणारा सोलर अनुदान अनुदानाची अट आणि आधीच हप्ते मिळाले असल्यास काय होणार याबाबत स्पष्ट माहिती पाहूया
घरकुल 50,000 हजाराची वाढीव अनुदान कशा प्रकारे देतात
राज्य शासनाने 4 एप्रिल 2025 रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय योजनेनुसार ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार प्रत्येक पात्र घरकुल लाभार्थ्यांना खालील प्रमाणे अनुदान दिले जातात 35 हजार रुपये घरकुल यासाठी 15 हजार रुपये सोलर प्रणाली बसवण्यासाठी या माध्यमातून प्रत्येक घरकुला वर सौर ऊर्जा प्रणाली उभारण्याचे राज्य शासन उद्देश आहे यामुळे ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा वापर वाढणार असून वीज खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे
घरकुलाचे वाढीव अनुदान कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार
राज्य शासनाच्या निर्णयानुसार खालील योजनेतील लाभार्थी या वाढीव अनुदान साठी पात्र असणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजना सन 2024-25 पासून सुरू करण्यात आली आहे योजना 2028 -29 पर्यंत राबवली जाणार आहे या कालावधीत राज्यात मध्ये सुमारे 19.66 लाख घरकुलाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे या टप्प्यात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 50 हजाराचे अनुदान मिळणार आहे
राज्य शासनाच्या ग्रामीण घरकुल योजना
राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनेतील खालील लाभार्थी नाही हे वाढीव अनुदान लागू होणार आहे रमाई आवास योजना, शहरी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजना इतर मागास प्रवर्ग व विशेष प्रवर्ग घरकुल योजना या योजनेमध्ये सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान दिले जाणार
आधीच घरकुलाचे तीन हप्ते त्याचे अनुदान मिळेल का?
हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे जर तुमचे घरकुल सन 2024-25 या वर्षामध्ये मंजूर झाले असेल तर तुम्हाला आधी तीन हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला वाढीव पन्नास हजार रुपयांच्या अनुदानासाठी पात्र ठरू शकतात परंतु जर तुमचे घरकुल 2024- 25 पूर्वी मंजूर झाले असले तर हे वाढीव अनुदान लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या घरकुल मंजुरीचे वर्ष तपासणे अत्यंत आवश्यक आहे
सोलार बसवण्याचे महत्त्व काय आहे
या योजनेतील 50 हजार रुपये पैकी 35 हजार बांधकामासाठी आणि 15 हजार रुपये सोलर साठी देण्यात येतात जर लाभार्थ्यांनी सोलर प्रणाली बसवले नाहीतर 15 हजार रुपयाची सोलर अनुदान देणार नही त्यामुळे सोलर बसविणे आवश्यक ठेवण्यात आलेले आहे राज्य शासनाच्या उद्देश ग्रामीण भागामध्ये सौर ऊर्जा वापर वाढवणे हा आहे
राज्य शासनाचा निधी कसा उपलब्ध होईल
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मिळणाऱ्या उद्दिष्टासाठी आवश्यक निधी संबंधित विभागाच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामध्ये खालील विभागाचा समावेश होतो सामाजिक न्याय विभाग आदिवासी विकास विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग ग्रामीण विकास विभाग या विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे
2024-25 मधील लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद
राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना वाढीव 50,000 चे अनुदान दिले जाणार आहे तसेच दोन पुढील कालावधीत म्हणजेच
- 2025-26
- 2026-27
- 2027-28
- 2028-29
या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील पात्र लाभार्थ्यांना ही अनुदान लाभ मिळणार आहे
लाभार्थ्याने काय तपासावे
जर तुम्हाला वाढीव 50 हजार रुपयांचे वाढीव अनुदान मिळणार आहे का हे तपासायचे असेल तर बाबी तपासा
- तुमचे घरकुल मंजूर वर्ष योजनेत कोणते आहे
- योजना कोणती आहे
- तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील लाभार्थी आहात का
तुमचे मंजुरी 2024-25 मध्ये झाली आहे का सोलर बसण्याची तयारी आहे का या सर्व बाबी पूर्ण असल्याने वर्क तुम्ही या अनुदानासाठी पात्र ठरू शकता
हे अनुदान कधी मिळणार आहे
राज्य शासनाच्या निर्णयानुसार हे त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झालेले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे उर्वरित लाभार्थ्यांना ही लवकरच त्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता आहे
निष्कर्ष
राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांसाठी वाढीव 50 हजार रुपयांचे अनुदान हे अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे या अनुदानामुळे ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी मोठी आर्थिक मदत होणार आहे तसेच सौर उर्जा वापर वाढण्यास मदत होणार आहे जर तुमचे घरकुल 2024-25 मध्ये मंजूर झाले असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे तात्काळ आपल्या ग्रामपंचायत किंवा संबंधित कार्यालय मध्ये संपर्क करून माहिती तपासून घ्या ही माहिती इतर घरकुल लाभार्थ्यांना पर्यंत जरूर शेअर करा जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ जाईल






