divyang scholarship yojana : शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ आता मिळणार 500 ते 1000 मदत..

राज्यांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठा दिलासादायक आणि सकारात्मक निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून 1 /एप्रिल/2026 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर शिशुवर्ग पासून बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यावृत्तीत वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून

या निर्णयामुळे राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळणार असून राज्य शासनाने तयार केलेल्या व्हिजन डॉक्युमेंट मध्ये शिक्षण आणि कौशल्य विकासाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे याच अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी आर्थिक मदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

राज्यात दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक योजना या 8 ते 34 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आहेत त्यामुळे या योजनेमध्ये बदल करून त्या अधिक परिणाम कारक करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती या पार्श्वभूमीवर शासनाने आता प्रत्यक्षात पाऊल उचलून या निर्णयाची अंमलबजावणी केली या निर्णयानुसार शिशुवर्ग ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा 500 शिष्यावृत्ती देण्यात येणार आहे ही रक्कम पूर्वीच्या तुलनेमध्ये लक्षणीयरित्या वाढण्यात आलेली आहे

त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे तसेच ग्रामीण व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंब विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल 9वी ते 10वी मध्ये शिकणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यार्थ्यांना दरमहा 800 ते आणि अनिवासी विद्यार्थ्यांना दरमहा 600 इतकी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे

माध्यमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो या टप्प्यावर मिळणारी ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु ठेवण्याकरिता यांना आर्थिक मदत देणारी ठरू शकते असेच अकरावी व बारावी शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार व अनिवासी विद्यार्थ्यांना दरमहा 800 इतकी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे उच्च प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर खर्च वाढत असल्यामुळे ही वाढ विद्यार्थ्यांकरिता अत्यंत उपयुक्त आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येणार नाही

विशेष म्हणजे या निर्णयांमध्ये दिव्यांगाच्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणतेही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही ही बाब विशेष विश्वाससह मानले जात आहे याशिवाय अकरावी ते बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क देखील शासनाच्या माध्यमातून भरले आहे तसेच

अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा 150 इतकी वा चूक वाचक भत्ता देण्यात येणार आहे याबाबत यामुळे अंध विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असणारी अतिरिक्त मदत मिळणार आहे याच प्रमाणे दरवर्षी अभ्यास दौऱ्यासाठी पाचशेपर्यंत अर्थसहाय्य देखील देण्यात येणार आहे पूर्वी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही केवळ 1 हजार ते 200 इतकी मर्यादित होती परंतु आता ही वाढवून काही वर्गांसाठी 1000 पर्यंत करण्यात आलेले आहे ही वाढ निश्चितच मोठी व महत्त्वाची मानली जात आहे

या वाढीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अधिक चालना देखील मिळणार आहे याच आत्मविश्वासही वाढेल याशिवाय शिष्यावृत्ती वाढण्यासाठी राज्य शासनाने सुमारे 23 कोटी 1 लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीला मान्यता दिलेली आहे यावरूनच शासन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त निधीला मान्यता देण्यात आली शिक्षणाबाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट होते या निर्णयामुळे राज्यांमधील अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे

एकंदरीत पाहता दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यावृत्तीमध्ये करण्यात आलेली ही वाढ केवळ आर्थिक मदत त्यांच्या शिक्षणाच्या हक्काला बळ देणारी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची पायरी देखील शासनाच्या या निर्णयामुळे दिव्यांग विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास निश्चित मदत होईल अशा प्रकारचे निर्णय पुढील काळातही घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Leave a Comment