mahadbt anudan : महाडीबीटी अनुदान वितरण सुरू प्रतीक्षा कायम..

राज्यामधील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाडीबीटी 53 अंतर्गत अनुदान वितरणाबाबत महत्वपूर्ण अपडेट समोर आले आहेत ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन कृषी यांत्रिकीकरण तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे 30 आणि 31 2026 रोज हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्यात आले आहे पुढील आठवड्यातही मोठ्या प्रमाणावर अनुदान वितरण सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे राज्यात राज्यातील शेतकऱ्यांकडून कृषी विभागाच्या योजनेचे मागणी सातत्याने वाढत आहे विशेष कृषी यांत्रिकीकरण सिंचन तुषार सिंचन व फळबाग लागवड या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत शासनाने उपलब्ध निधी नुसार टप्प्याटप्प्याने अनुदान वितरण प्रक्रिया सुरू ठेवले आहे

ठिबक तसेच तुषार सिंचन साठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध

ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेकरिता शासनाकडून सुमारे 235 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे या निधीमधून प्रलंबित अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे सध्याची स्थिती सुमारे 63,971 शेतकऱ्यांना एकूण 238 कोटी 14 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे त्यापैकी केवळ 30 मार्च रोजी 8 ते 9 हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहेत मात्र अनुदान अजूनही 2 लाख 15 हजार 893 शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे यासाठी सुमारे 448 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून आहे

कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 78 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत आतापर्यंत सुमारे 78,502 शेतकऱ्यांना 473 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत केवळ एका दिवसात 6,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे मात्र अजूनही सुमारे 3,12,161 शेतकरी या योजनेअंतर्गत अनुदानाच्या प्रत्यक्ष मध्ये असून याकरिता सुमारे 1121 कोटी रुपयांची आवश्यकता असून लवकरच 150 ते 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित होण्याची शक्यता आहे

मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेमध्ये पूरक अनुदान वितरण

मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 25 लाखो हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 87 कोटी 66 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अर्ज होते मात्र उपलब्ध निधी नुसार अनेक शेतकऱ्यांच्या अर्ज मंजूर करून अनुदान वितरण प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आले आहेत

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना साठी 42.97 कोटी रूपयांचा निधी मंजूर

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड यासाठी शासनाने 2025- 26 या वर्षासाठी सुमारे 42 कोटी 97 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून तसेच 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षातील थकीत अनुदानासाठी 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे या योजनेअंतर्गत काल 30 मार्च रोजी 33 शेतकऱ्यांना 21 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे तसेच 2024 25 वर्षातील 5 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 74 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून तरी अजून सुमारे 21- लाख 40 हजार शेतकरी 52 कोटी 42 लाख रुपयांच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत शासन उपलब्ध निधीच्या आधारे हे अनुदान लवकरच वितरित होण्याची शक्यता आहेत

पुढील आठवड्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावर अनुदान वितरण अपेक्षित

कृषी विभागाच्या डॅशबोर्ड नुसार 31 मार्च 2026 रोजी सकाळी 8:50 वाजेपर्यंत ची आकडेवारी पाहता राज्यभरात अनुदान वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे 30 व 31 मार्च रोजी मार्च रोजी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आले आहे या आठवड्यात काही सुट्टी असल्या तरी पुढील आठवड्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनुदान वितरित होण्याची शक्यता आहे विशेष ठिबक सिंचन तुषार सिंचन व कृषी यांत्रिकीकरण योजनेतील प्रलंबित अर्ज यांना प्राधान्य दिले जाणार आहे

निधीच्या अभावी काही शेतकरी प्रलंबित

राज्यातील शेतकऱ्यांकडून योजनेसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्यामुळे उपलब्ध निधी तुलनेत कमी पडत आहे यामुळे काही शेतकऱ्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते अशा प्रलंबित प्रकरणासाठी पुढील आर्थिक वर्षात अतिरिक्त निधीची तरतूद केली जाणार आहे तथापि उपलब्ध निधी नुसार शासन टप्प्याटप्प्याने अनुदान वितरण करत आहे हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे याच यामुळे त्यांचे अनुदान अर्ज प्रलंबित आहेत ज्यांनी घाबरून जाऊ नये पुढील काही दिवसांमध्ये त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्याची शक्यता आहे

Leave a Comment