मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यांमधील महिलांकरिता अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक योजना ठरले आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक साहाय्य दिले जाते दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या थकित हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो लाभार्थी महिलांनी साठी आता एक मोठा आणि सकारात्मक अपडेट्स समोर आले आहे राज्य शासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याचा थकित हप्ता आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात करण्यात येत आहे
मिळालेल्या माहितीनुसार हा थकित हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाणार आहे म्हणजे 27 मार्च पासून ते पुढील काही दिवसांच्या कालावधीत म्हणजेच 28 व 29 किंवा 30 मार्च 2026 या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची होणार आहे यामुळे ज्या महिलांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही घाबरण्याची गरज किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही शासनाने निधी उपलब्ध करून दिल्या असून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता मात्र काही राजकीय प्रक्रिया व केवायसी हाताळणीमुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास विलंब झाला होता आता या प्रक्रियेला अंतिम मंजुरी त्यामुळे उर्वरित पात्र महिलांच्या खात्यामध्ये थकित रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थ्यांनी आपली ekyc प्रक्रिया पूर्ण केलेली आहे
मात्र सुरवातीच्या टप्प्यात महिला लाभार्थ्यांची केवायसी अपूर्ण किंवा चुकीची असल्यामुळे त्यांना हप्त्याचा लाभ मिळाला अडचणी येत होत्या शासनाने अशा महिलांना केवायसी ची दुरूस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ व संधी दिली होती त्यानुसार अनेक महिला आपल्या केवायसी ची दुरुस्ती पूर्ण केलेली आहे आता ज्या महिलांनी केवायसी पूर्ण झाली आहे व त्यांचे शासनाने निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार पात्र ठरतात अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा थकित हप्ता जमा केला जाणार आहे
विशेष म्हणजे काही लाभार्थी महिलांच्या खात्यात आज किंवा उद्या म्हणजेच 27 तारीख किंवा 28 मार्च रोजी हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल तर उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यात सोमवार पर्यंत म्हणजे 30 मार्च पर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे सर्व पात्र महिलांनी आपले बँक खात्याची नियमितपणे तपासणी करावी व हप्ता जमा झाल्याची खात्री करून घ्यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे
या योजनेमुळे महिलांना निश्चित आर्थिक मदत मिळत असल्याने त्यांच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यास मदत होते तसेच कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये ही महिला सहभाग वाढविण्यास या योजनेचा मोठा फायदा होतो आहे त्याच्या माध्यमातून या योजनेचे वितरण पारदर्शक व नियमित पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे त्यामुळे महिला लाभार्थ्यांना अद्याप काही कारणास्तव हप्ता मिळाला नाही त्यांनी आपली केवायसी स्थिती तपासून घ्यावी व आवश्यक असल्यास तात्काळ दुरुस्ती करावी पात्र असलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ निश्चितपणे मिळणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे
एकंदरीत फेब्रुवारी हिन्याच्या थकीत हप्त्याची प्रतीक्षा करणार्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणीसाठी हा एक महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय आणि आनंदाची बातमी आहे येत्या काही दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हा आता जमा होणार त्यामुळे महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष ठेवावी व या योजनेचा लाभ मिळावा





