दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये मासिक मानधन 1 एप्रिल 2026 पासून नवीन विभागाकडून पेन्शन वितरण निर्णय जारी

divyang pension yojana new update : महाराष्ट्रा शासनाच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मासिक मानधनाच्या वितरण प्रक्रियेत बदल करण्यासंदर्भात 23 मार्च 2026 रोजी शासन निर्णय GR जारी करण्यात आला आहे या निर्णयानुसार 1 एप्रिल 2026 पासून राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक सुमारे 2500 रुपये मानधन आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे या सर्व निर्णयामुळे राज्यात हजारो दिव्यांग नागरिकांकरिता त्यांच्या पेन्शन योजनेचा लाभ अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळण्याची अपेक्षा व्यक्त करणे आहे

दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाचा महत्त्वाचा निर्णय

राज्यामधील दिव्यांग नागरिकांकरिता विविध सहाय्यक योजना राबवण्यात येतात परंतु (divyang pension yojana 2026) या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते यापूर्वी या योजनेचे प्रशासन समाज कल्याण विभागाकडे होते मात्र आता शासनाने दिव्यांग नागरिकांकरिता स्वतंत्र व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे 26 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार मासिक मानधन नवीन विभागाच्या नियंत्रणाखाली वितरित करण्यात येणार आहे

1 एप्रिल 2026 पर्यंत कोणता बदल होणार

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एक एप्रिल 2026 पर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विशेष सहाय्य (divyang pension yojana 2026 )योजने अनुदान थेट दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे या बदलामुळे निधी वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान पारदर्शक आणि प्रभावी होण्याची शक्यता आहे तसेच लाभार्थ्यांना वेळेत पेन्शन मिळवण्यासाठी प्रशासनिक नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे

कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार 2500 रुपये मानधन

राज्यांमधील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना करिता विविध योजनेच्या माध्यमातून सध्या सुमारे 2500 रुपये इतके मानधन दिले जाते हे मानधन खालील योजनेच्या अंतर्गत दिली जाते

  • संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना
  • श्रावणबाळ सेवा दिव्यांगा राज्य निवृत्ती वेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेंशन योजना

divyang pension yojana new update या सर्व योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना 1 एप्रिल 2026 पासून नवीन विभागाच्या माध्यम मानधन वितरीत करण्यात येणार

UDID कार्ड KYC का महत्वाचे आहे

दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्याकरिता UDID कार्ड (Unique Disability ID Card) अत्यंत महत्त्वाचे आहे शासनाच्या निर्देशानुसार ज्या लाभार्थ्यांनी UDID Card तयार केले आहे आणि त्यांची ही प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा लाभार्थ्यांना नियमित मानधन लाभ दिला जाणार आहे म्हणून ज्या लाभार्थ्यांनी कडे अध्यापक UDID Card नाही किंवा केवायसी पूर्ण झालेले नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे हिताचे आहे अन्यथा पेन्शन वितरित प्रक्रिया अडचणीत येऊ शकते

योजनेच्या अंमलबजावणी करिता नवीन अधिकारी नियुक्त

शासनाने divyang pension yojana new update या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता प्रशासनिक स्तरावर महत्वाचे बदल केले आहे महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मध्ये नियम 15/3 अंतर्गत आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले यामुळे आता योजनेचा निधी वितरणाची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे

समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरण

यापूर्वी दिव्यांग लाभार्थ्यांच्या योजनेचे प्रशासन समाज कल्याण विभागाकडे होते मात्र दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र आणि अधिक नवी व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे या बदलामुळे भविष्यामध्ये दिव्यांग नागरिक करिता नवीन योजना सुरू होण्याची शक्यता देखील वाढले आहे या तसेच विद्यमान योजनेची अंमलबजावणी अधिक सकारात्मक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

लाभार्थ्याने पुढे काय करावे

राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी खालील बाबींची पूर्तता करणे महत्त्वाचे असेल

  1. UDID Card तयार करणे
  2. UDID Card ची Kyc पूर्ण करणे संबंधित बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवणे
  3. आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करणे या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास लाभार्थ्यांना 1 एप्रिल 2026 पासून नियमित मानधन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही

शासन निर्णय कुठे पाहावा

दिव्यांग लाभार्थ्यांना जारी करण्यात आलेला हा महत्वाचा शासन निर्णय 23 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे लाभार्थ्यांनी जीआर आवश्य पाहावा आणि त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी जर तुम्हाला जीआर पाहायचा असेल तर आमच्या व्हाट्सअप चैनल ला जॉईन करा

एकूण पाहता एक एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पेन्शन वितरित प्रक्रिया करण्यात आलेली आहे बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे या निर्णयामुळे राज्यातील पात्र दिव्यांग नागरिकांना दरमहा मिळणारी 2500 रुपये मानधन अधिक सुलभ व पारदर्शक वेळेत मिळण्यास मदत होणार आहे त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या निर्णयाचे नोंद घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी धन्यवाद

Leave a Comment