भारतामधील सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याकरिता केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत अशाच प्रकारे एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहिती मराठी) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजनेचा उद्देश दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबात मधील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा आहे त्यातील प्रमुख सदस्याचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले अशावेळी (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहिती मराठी) ह्या योजनेअंतर्गत शासनाकडून एकरकमी आर्थिक मदत म्हणजेच आर्थिक सहाय्य दिले जाते या लेखामध्ये आपण राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ची पूर्णपणे माहिती तसेच योजनेची उद्देश पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया लाभार्थ्याची रक्कम आणि महत्त्वाच्या अटी याचा सविस्तर आढावा घेणार आहोत
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना म्हणजे काय
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही केंद्र शासनाची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी राज्य शासनाच्या माध्यमातून चालवली जाते या योजनेचा मुख्य हेतू म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबामधील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक रित्या किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला तातडीने आर्थिक सहाय्य देणे या (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना शासन निर्णय) योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना एकरकमी 20,000 रुपये इतकी आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते ही मदत कुटुंबाला तात्पुरता आर्थिक आधार देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते
योजनेचा उद्देश
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना प्रमुख उद्देश म्हणजे कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक आधार देणे गरीब व गरजू कुटुंबांना संकटाच्या काळामध्ये मदत करणे सामाजिक सुरक्षा मजबूत ठेवणे अचानक निर्माण झालेल्या प्रसंगी आर्थिक अडचणीवर मात करण्यास मदत करणे या सर्व योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक तातडीची मदत मिळते व त्यांच्या दैनिक गरजा भागवण्यास मदत होते लाभाची रक्कम या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला शासनाकडून एक रकमी 20 हजार रुपये इतकी एकरकमी मदत दिली जाते ही रक्कम कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर जमा केले जाते ही रक्कम जरी मोठी नसली तरी अचानक झालेल्या संकटाच्या काळामध्ये ती अत्यंत महत्त्वाची मदत करू शकते
पात्रता निकष
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना चा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक असेल
- अर्जदार हा कुटुंबातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील BPL असणे आवश्यक असेल
- मृत व्यक्तीचे कुटुंबातील प्रमुख कमावती व्यक्ती असणे आवश्यक आहे
- मृत व्यक्तीचे वय मृत्यूच्या 18 ते 59 वर्ष दरम्यान असावे
- मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती कारण झालेला असावा
- अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचा किंवा 15 वर्षापासून रहिवासी असणे आवश्यक आहे
- मृत्यू झाल्यापासून 2 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे
- वरील अटी पूर्ण करणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकतो
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
या योजनेकरिता अर्ज करतांना खालील कागदपत्रे आवश्यक असतात
मृत व्यक्तीचे कागदपत्रे :
- मृत्यू प्रमाणपत्र
- मृत्यू नोंद रजिस्टर च्या पानाची छाया प्रत
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला (TC) किंवा जन्म प्रमाणपत्र
- रेशन कार्ड (गरजेनुसार)
अर्जदाराची कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- कुटुंबातील वारसा असल्याचे प्रमाण
- ग्रामसेवकाचे दिलेले प्रमाणपत्र
इतर आवश्यक कागदपत्रे
- BPL असल्याचा पुरावा
- रेशन कार्ड
- तहसीलचा उत्पन्नाचा दाखला
- ग्रामसेवकाने दिलेले प्रमाणपत्र
- नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रातील मृत्यू नोंद प्रमाणपत्र (शहरी भागासाठी)
ही सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे जोडून आवश्यक असते
rashtriya kutumb labh yojana form : अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना साठी अर्ज 2 प्रकारे करता येतो
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अर्जदार खालील माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतो आपले सरकार सेवा पोर्टल आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन अर्ज खालील ठिकाणी करता येतो तहसील कार्यालय किंवा आपण संजय गांधी निराधार योजना शाखा अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आवश्यक असते
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज pdf : अर्ज मंजुरी प्रक्रिया
अर्ज सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते अर्जाची प्राथमिक छाननी केली जाते कागदपत्राची पातळी केली जाते काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्यास सांगितले जाते वारसा असल्याचे प्रमाणपत्र तपासले जाते अंतिम मंजुरी दिली जाते ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाते
अर्ज प्रक्रिया कालावधी साधारणपणे : अर्ज सादर केल्यानंतर 30 ते 60 दिवसाच्या आत प्रक्रिया पूर्ण होते कागदपत्रे योग्यरीत्या असल्यास लवकरच मंजुरी मिळते काही त्रुटी असल्यास कालावधी वाढवू शकतो म्हणूनच अर्ज करताना सर्व कागदपत्रे पूर्ण आणि योग्य असणे महत्त्वाचे आहे
ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र का आवश्यक आहे
या योजनेमध्ये ग्रामसेवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते ग्रामसेवक खालील बाबीची पुष्टी करतो मृत व्यक्ती कुटुंबातील प्रमुख कमावती व्यक्ती होती अर्जदार वारसा आहे कुटुंब BPL श्रेणीमध्ये येतो हे प्रमाणपत्र अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असते
योजनेचे फायदे
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना चे अनेक फायदे आहेत गरीब कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत मिळते संकटाच्या काळामध्ये आर्थिक आधार मिळतो कुटुंबाची परिस्थिती स्थिर ठेवण्यास मदत होते शासनाकडून थेट लाभ मिळतो अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे ही योजना समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते
अर्ज करताना घ्यावयाची काळजी
सर्वप्रथम अर्ज करताना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात सर्व कागदपत्रे योग्य आणि पूर्ण असावे अर्ज 2 वर्षाच्या आत करणे महत्त्वाचे आहेत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र जोडणे महत्त्वाचे मृत्यू प्रमाणपत्र अनिवार्य आहे बीपीएल पुरावा जोडणे आवश्यक असेल ही काळजी घेतल्यास मंजूर न होण्याची भीती कमी होते
निष्कर्ष
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना उपयुक्त योजना ठरत आहे कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबावर आर्थिक संकट वाढते अशा परिस्थितीत शासनाकडून 20,000 रुपयाची एकरकमी मदत ही कुटुंबाकरिता मोठा आधार ठरते म्हणूनच जर आपल्या परिसरातील कोणत्याही गरजू कुटुंबांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यांना या योजनेबद्दल माहिती देऊन अर्ज करण्यास मदत करणे ही सामाजिक जबाबदारी आहे योग्य वेळी अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो





