भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली LIC ने महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे ज्याला विमा सखी योजना असे म्हणतात ही योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी च्या एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि त्यासाठी त्यांना स्टायपेंड देखील दिला जातो ही योजना विशेष ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी तयार करण्यात आली आहे या लेखामध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही योजना काय आहे पात्रता काय आहे किती पैसे मिळतात कोणती कामे करावी लागतात आणि अर्ज कसा करायचा
bima sakhi yojana kya hai : म्हणजे काय
विमा सखी योजना ही महिलांची स्टायपेंड योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसीचे एजंट म्हणून काम करण्याची संधी दिली जाते या योजनेचा कालावधी तीन वर्षाचा असतो आणि या तीन वर्षांमध्ये महिलांना दरमहा स्टायपेंड दिला जातो महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत महिलांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी दिली जात नाही हे काम कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर असते म्हणजेच तुम्ही एलआयसीचे एजंट म्हणून काम करणार असता
आणि ग्राहकांना विमा पॉलिसी घेण्यासाठी मार्गदर्शन करणार असतात या योजनेत महिलांना विमा क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळतो आणि भविष्यात चांगले करिअर घडवण्याची संधी ही मिळते
स्टायपेंड आणि बोनस किती मिळतो
या योजनेमध्ये महिलांना तीन वर्ष वेळ वेगवेगळ्या प्रमाणात स्टायपेंड दिले जाते पहिले
- वर्ष पहिल्या : वर्षात महिलांना दरमहा 7, 000 स्टायपेंड दिले जाते
- दुसरे वर्ष : दुसऱ्या वर्षात ₹6000 स्टायपेंड दिले जाते मात्र यासाठी काही परफॉर्मन्स निकष करावे लागतात
- तिसरे वर्ष : तिसऱ्या वर्षात दरमहा 5 हजार स्टायपेंड दिली जाते
या योजनेत आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे 48,000 बोनस मिळू शकतो हा बोनस मिळवण्यासाठी महिलांना ठराविक संख्येने विमा पॉलिसी विक्री करायची आहे
काम काय करावे लागते
विमासखी योजनेमध्ये काम करणाऱ्या महिलांचे मुख्य काम म्हणजे लोकांना विमा पॉलिसी बद्दल माहिती देणे आणि त्यांना पोलिसी घेण्यासाठी प्रोत्साहन करणे
उदाहरणार्थ :
ग्राहकांना विमा योजनेची माहिती देणे
नवीन विमा पॉलिसी काढून देणे
त्यांच्या शंका दूर करणे
विमा संबंधित सेवा देणे
या योजनेत पहिल्या वर्षात किमान 24 पॉलिसी पूर्ण करणे आवश्यक असते म्हणजेच साधारणपणे महिन्याला 2 पॉलिसी तरी करणे अपेक्षित असते जर हे लक्ष्य केले तरच बोनस आणि पुढील वर्षातील स्टायपेंड मिळवण्याची पात्रता कायम राहते
पात्रता निकष
बीमा सखी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काय पात्रता अटी आहेत
अर्जदार महिला असणे आवश्यक आहे किमान वय 18 वर्षे असावे कमाल वय 70 वर्षे असून शकते किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एलआयसी चे सध्याचे एजंट किंवा कर्मचारी त्यांचे जवळचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र नाहीत एलआयसीचे निवृत्ती कर्मचारी किंवा माझी एजंट पुन्हा या योजनेचा अर्ज करू शकत नाही
bima sakhi yojana आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी अर्ज करताना किंवा निवड झाल्यानंतर काय कागदपत्रे सादर करावे लागतात पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड वय आणि (पत्ता पुरावा) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र पुरावा सर्व कागदपत्राची सेल्फ कॉपी द्यावी लागते
lic bima sakhi yojana apply online 2026 : अर्ज कसा करायचा
बीमा सखी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे सर्वप्रथम एलआयसीच्या (bima sakhi yojana official website) अधिकृत वेबसाईटवर जावे तेथे LIC Bima Sakhi Recruitment किंवा Apply for Bima Saki हा पर्याय निवडा अर्ज अर्ज फ्रॉम मध्ये खालील माहिती बारावी पूर्ण नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी संपूर्ण पत्ता पिन कोड त्यानंतर तुम्ही एलआयसीचे एजंट किंवा कर्मचारी आहात का असा प्रश्न विचारला जाईल जर नसेल तर No हा पर्याय निवडा कॅपच्या भरून सबमिट बटणावर क्लिक करा पुढील पेज वर तुम्हाला तुमचे राज्य शहर आणि एलआयसी शाखा निवडावे लागते तुम्ही किमान 1 शाखा आणि जास्तीत जास्त 3 शाखा निवडू शकता शेवटी Submit Lead Form वर क्लिक करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला Thank you for your interest असा मेसेज दिसेल
अर्ज केल्यानंतर काय होते
फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी एलआयसी चे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतात त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते त्यामध्ये कागदपत्रांची तपासणी प्रतिक्षण शाखा स्तरावर मुलाखत हे सर्व पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बीमा सखी म्हणून काम करण्याची संधी मिळते
फसवणुकीपासून सावधान राहा
या योजनेसाठी अर्ज करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही जर फोन कॉल करून पैसे मागत असेल तर तो फसवणुकीचा प्रकार असू शकतो त्यामुळे अशा कॉल्स पासून सावधान राहा आणि अधिकृत माहिती वर विश्वास ठेवा बीमा सखी योजना ही महिलांसाठी एक चांगली संधी आहे या योजनेमुळे महिलांना घरबसल्या किंवा आपल्या परिसरात काम करून उत्पन्न करता येते तसेच बीमा क्षेत्रात अनुभव मिळाल्यामुळे भविष्यात अधिक मोठ्या संधीही उपलब्ध होऊ शकतात तर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असेल तर या योजनेसाठी नक्कीच अर्ज करू शकता योग्य माहिती घेऊन अर्ज केल्यास महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास ही मदत नक्कीच मदत करु शकते
📢 महाराष्ट्र तील सर्व सरकारी योजना अपडेट मिळवण्यासाठी सर्वात आधी योजना अपडेट WhatsApp आणि Telegram channel जॉईन करा 🌾
शेतकरी योजना🧑🎓 विद्यार्थी योजना 🏠 घरकुल योजना 📢 नवीन सरकारी अपडेट
📢 Telegram चॅनेल👇https://t.me/+EUwBrxRYRU8wN2M1





