pradhanmantri matru vandana yojana track status : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्जाची स्थिती कशी तपासावी

भारत सरकार कडुन गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व योजना PMMVY या योजनेअंतर्गत पात्र महिला व आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे गर्भधारणे दरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते अनेक महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेला असतो परंतु काही अर्ज केल्यानंतर ही रक्कम खात्यात जमा झालेली नसते अशा वेळी अर्ज मंजूर झाला आहे का अर्ज प्रलंबित आहे का त्याचे पेमेंट प्रक्रियेत आहे का हे जाणून घेणे आवश्यक असते आता सरकारने ही माहिती ऑनलाइन पद्धतीने तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्जाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची याची सविस्तर माहिती पाहणार आहोत

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना म्हणजे काय

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय द्वारे चालवली जाणारी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देणे आहे या अंतर्गत पात्र महिलांना साधारणपणे 5 हजारा पर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाते ही रक्कम हप्त्यामध्ये दिली जाते आणि ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते या योजनेचे काही मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहे

  • गर्भवती महिला चे पोषण आणि आरोग्य
  • बाळाच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर आवश्यक काळजी घेण्यास प्रोत्साहन
  • आई आणि बाळाचा मृत्यूदर कमी करणे

अर्ज केल्यानंतर स्थिती तपासणे का आवश्यक आहे

अनेक वेळा अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांना खालील प्रश्न पडतात माझा अर्ज मंजूर झाला आहे का अर्ज अद्याप प्रलंबित आहे का अर्ज नाकारला गेला आहे का पेमेंट प्रक्रिया सुरू आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही ऑनलाइन ट्रॅक स्टेटस (pradhanmantri matru vandana yojana track status) पर्याय वापरू सहज पाहू शकतात

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्जाची स्थिती कशी तपासावी

अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा गुगलमध्ये PMMVY सर्च करा सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा संगणकावर इंटरनेट सुरू करा आणि त्यामध्ये PMMVY किंवा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना असे सर्च करा अधिकृत वेबसाईट उघडा सर्च केल्यानंतर तुम्हाला योजनेची अधिकृत वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवर क्लिक करून ती उघडा डॅशबोर्ड मध्ये Track status स्टेटस पर्याय निवडा वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला वेगळे दिसतील

त्या मध्ये Track status नावाचा नवीन पर्याय दिल्याला असतो त्या पर्यायावर क्लिक करा Beneficiary ID किंवा Registered Mobile Number टाका त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील Beneficiary ID -Registered Mobile Number जर अर्ज करताना मोबाईल नंबर मिळालेला Beneficiary ID तुमच्याकडे असेल तर तो टाका जर आयडी माहीत नसेल तर रजिस्टर मोबाईल नंबर टाका कॅपच्या कोड भरा स्क्रीनवर आल्याला कॅपच्या कोड पाहून तो खालील बॉक्समध्ये टाका Validate वर क्लिक करा सर्व माहिती भरल्यानंतर Validate या बटणावर क्लिक करा मोबाईल आल्याला OTP टाका Validate केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी वन टाइम पासवर्ड तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाका Go बटणावर क्लिक करा ओटीपी टाकल्यानंतर Go या बटणावर क्लिक करा

अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल

Go वर क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये खालील माहिती समाविष्ट असते

  1. लाभार्थ्यांचे नाव
  2. राज्य
  3. जिल्हा
  4. तालुका
  5. गावाचे नाव
  6. संबंधित अंगणवाडी केंद्र

या शिवाय अर्जाची सध्याची स्थिती देखील दाखवली जाते

अर्जाच्या स्थितीचे वेगवेगळे टप्पे

अर्जाची प्रक्रिया वेगवेगळ्या स्तरावर तपासली जाते प्रत्येक स्तरावर अर्ज पूर्ण झाल्यावर ग्रीनटिक दिसतो

  • Anganwadi Level सर्वप्रथम अंगणवाडी स्तरावर तपासला जातो
  • Mo Level (Medical Officer) त्यानंतर अर्ज वैद्यकीय अधिकार्‍याकडे पाठवला जातो
  • State Level Verification पुढील अर्ज राज्यस्तरावर पाठवला जातो
  • Add Payment Level सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज Payment Level वर पोहोचतो याचा अर्थ अर्ज मंजूर झालेला आहे आणि पेमेंट प्रक्रिया सुरू आहे
  • Payment Done पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अर्जाच्या स्थितीत Payment Done असे दिसते याचा अर्थ तुमच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे

अर्ज प्रलंबित असल्यास काय करावे

जर अर्जाची स्थिती पेंडिंग दाखवत असेल तर घाबरण्याची गरज नाही काही वेळा पाताळणी प्रक्रियेमुळे अर्ज प्रलंबित राहू शकतो अशा वेळी पुढील गोष्टी करा काही दिवसांनी पुन्हा स्थिती तपासा जवळच्या अंगणवाडी सेविका संपर्क साधा आवश्यक कागदपत्रांची पाहणी करून घ्या

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे फायदे

या योजनेत अनेक फायदे आहेत ती महिलांना आर्थिक साहाय्य मिळणे आई आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते ग्रामीण भागातील महिलांना विशेष लाभ मिळतो रक्कम थेट बँक खात्यात जमा होते

निष्कर्ष. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने अवघ्या काही मिनिटात तपासू शकता Beneficiary ID किंवा Registered Mobile Number वापरून तुम्ही अर्ज मंजूर झाला आहे का पेमेंट प्रक्रिया सुरू आहे का किंवा पूर्ण पेमेंट झालेले आहे का ते सहज पाहू शकता

Leave a Comment