अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी मदत नुकसान भरपाई लाभार्थी याद्या जिल्हानिहाय जाहीर

ativrushti nuksan bharpai 2025 खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते सततच्या मुसळधार पावसामुळे पिके वाहून गेली काही ठिकाणी शेतजमीन पूर्णपणे जलमय झाली तर शेतकऱ्यांच्या विहिरी देखील खचल्या या सर्व नुकसानीची गंभीर दखल घेत शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आली होती नुकसानभरपाई वितरण करताना पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सार्वजनिक कराव्यात अशा स्पष्ट सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या त्यानुसार अनेक जिल्ह्यांनी आपल्या अधिकृत जिल्हा संकेतस्थळावर लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यास मदत केली आहे

त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचे नाव यादीत आहे की नाही हे तपासणे सोपे झाले आहे याच पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे असलेल्या किंवा खचून गेलेल्या विहिरीसाठी देखील शासनाने विशेष मदत जाहीर केली आहे या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 30 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आल्या असून त्यातील पहिला टप्पा म्हणून 15 हजार रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत या विहीर नुकसान भरपाईसाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या देखील आता जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जात आहेत सध्या विविध जिल्ह्याच्या लाभार्थी याद्या एकत्रित स्वरूपात एका वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसेच इच्छुक शेतकरी आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दोस्तावेज किंवा डॉक्युमेंट विभागांमध्ये ही या याद्या पाहू शकतात अनेक वेळा नागरिकांना थेट जिल्हा संकेतस्थळावर याद्या शोधणे अवघड जाते

त्यामुळे एका लिंकवर सर्व जिल्ह्याच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सर्वात आधी अहिल्यानगर जिल्हा सर्व तालुक्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत यामध्ये (ativrushti nuksan bharpai kyc) केवायसी प्रलंबित लाभार्थी तालुकानिहाय नुकसान भरपाई पात्र शेतकरी आणि संबंधित पीडीएफ फाइल्स उपलब्ध आहेत

त्यानुसार धुळे जिल्ह्यातील तालुकानिहाय याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत यवतमाळ जिल्ह्याचे (ativrushti nuksan bharpai Yadi) नुकसान भरपाई यादी सुद्धा आता उपलब्ध असून शेतकरी थेट लिंक वर क्लिक करून ती डाऊनलोड करू शकतात बुलढाणा जिल्ह्याच्या दोन स्वतंत्र याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत तसेच जळगाव जिल्ह्याचे तालुका आणि इतर याद्या देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे

नांदेड जिल्ह्यामध्ये घरात पाणी गेल्यामुळे किंवा घराचे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आले आहे खसलेल्या विहिरी साठी नुकसान भरपाईच्या याद्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याची यादी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे सोबतच सांगली आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्याच्या याद्या ही जाहीर करण्यात आल्या आहेत पुणे जिल्ह्यात विशेषत पुणे आणि हवेली तसेच इंदापूर तालुक्याच्या याद्या उपलब्ध आहेत जळगाव जिल्ह्यातील खसलेल्या विहिरी साठी ची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्याच्या याद्या ज्या ज्या काळात याद्या तयार होतील त्या याद्या याच लिंक वर सातत्याने अपडेट करण्यात येणार आहे

कर्जमाफीसाठी मोठा निर्णय : सर्व बँकांना निर्देश शेतकऱ्यांनी लगेच ही प्रक्रिया पूर्ण करा

कृषी विभागाचा मोठा निर्णय कुटुंबातील या व्यक्तीलाही मिळणार शेती अवजार अनुदानाचा लाभ

नमो शेतकरी महा सन्मान निधी हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा

रब्बी हंगाम 2025-26 साठी ई पीक पाहणी ची मुदत संपली तरी संधी कायम 10 मार्च पर्यंत सहाय्यकामार्फत नोंदणी शक्य

अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात ई-केवायसी, आधार मॅपिंग आणि पेमेंट स्टेटस कसं तपासायचं

दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व साबळीकरण योजनेत मोठा बदल : 23 जानेवारी 2026 चा नवा GR जाहीर, नाव्य लाभार्थ्यांना सामावेश

वरील आर्टिकल महत्वपूर्ण आहे नक्की भेट द्या

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नवीन अपडेट तपासणे गरजेचे आहे त्यासोबतच शासनाने नुकसानभरपाई पॅकेज अंतर्गत कोणत्या महिन्यात कोणत्या जिल्ह्यासाठी किती क्षेत्र मदत मंजूर करण्यात आली आहे सततच्या पाऊस रब्बी हंगाम अनुदान संबंधित सविस्तर माहितीही उपलब्ध करून दिले आहे अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही नुकसानभरपाई मोठा आधार ठरणार असून पारदर्शक पद्धतीने याद्या प्रसिद्ध केल्यामुळे अनेक विश्वास शासन व्यवस्थेवर अधिक दृढ होणार आहे

नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा धन्यवाद

Leave a Comment