कर्जमाफीसाठी मोठा निर्णय : सर्व बँकांना निर्देश शेतकऱ्यांनी लगेच ही प्रक्रिया पूर्ण करा

सर्वात बँकांसाठी कर्जमाफीचे निर्देश शेतकऱ्यांना तातडीने या गोष्टी करून घ्या अन्यथा वंचित राहण्याची शक्यता राज्य शासनाच्या सहकार विभागाने कर्जमाफी च्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे राज्यस्तरीय बँकर्स समितीने सर्व सरकारी बँकांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून कर्जमाफी साठी आवश्यक असलेले माहिती त्वरित सादर करण्याचे आदेश दिले असून यामध्ये प्रामुख्याने नॉन पर फार्मिंग अपडेट्स आणि ओव्हरडयु थकीत खात्याची सविस्तर माहिती मागवण्यात आल्या आहे याकरता सुमारे 54 विविध मुद्याचा सामावेश करण्यात आला असून फार्म बँकांना भरावा लागणार आहे

या नवीन अपडेट नुसार सरकार 30 सप्टेंबर 2025 पूर्वीचे कर्जमाफी करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येते पण यामध्ये 2019 च्या कर्जमाफी नंतर थकित राहिलेल्या शेतकर्‍यांकरिता विचार केला जाणार असल्याचे दिसत आहे जर ही प्रक्रिया 30 जून 2026 पूर्वी पूर्ण झाली तर 2025-26 व्या वर्षात नियमित कर्ज भरणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे शेतकरी नेत्यांनी या तारखेबाबत शंका उपस्थित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशी मागणी करत आहे

शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या यादीत आपले नाव निश्चित करण्यासाठी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे सर्व महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी महत्त्वाचे असतील त्याशिवाय कोणतेही शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तसेच शेतकऱ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि फार्मर आयडी ( farmer ID) सर्व कागदपत्र वरील माहिती नाव तारीख एक सारखेच असणे गरजेचे असेल जर या माहितीमध्ये तफावत असेल तर मात्र अजूनही शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे तो तांत्रिक अडथळे टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खाते आधार आणि पॅन कार्डला लिंक करणे आवश्यक असणार आहे

बँकेने माहिती पाठवताना कर्ज मंजूर झाल्याची तारीख कर्जाचा प्रकार तसेच केवळ पिक कर्ज माफ होणार आहे व्याजासह थकबाकी आणि एनपीए झाल्याची तारीख या सर्व गोष्टींची नोंद करण्याचे आहे काही बाबतीमध्ये दीड लाखापर्यंत च्या मर्यादित कर्ज माफी देऊन त्यावरील उर्वरित रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागण्याची शक्यता वाटत आहे शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या संबंधित बँक शाखेला भेट देऊन आपला फार्मर आयडी आणि बँक रेकॉर्ड तपासून घ्यावी त्यानंतर एकदा बँकेने याद्या अंतिम करून सरकारकडे पाठवल्या की त्यानंतर यामध्ये बदल करणे खूप कठीण होऊ शकते त्यामुळे आपल्या कागदपत्राची पातळी वेळेत करणे हिताचे ठरेल ही कर्जमाफी प्रक्रिया अत्यंत किचकट असून शेतकऱ्यांनी सजग राहणे आणि आपल्या हक्कासाठी संघटित राहणे आवश्यक असेल

Leave a Comment