अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा महाडीबीटी mahDBT अंतर्गत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य शासन या योजनेसाठी 23 जानेवारी 2026 रोजी 50 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिले आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना लवकरच आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
राज्यभरात कृषी यांत्रिकीकरण योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे ट्रॅक्टर, रोटावेटर, पावर टेलर, पेरणी व कापणी यंत्रे आदी कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी लाखो शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केले होते त्यापैकी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पात्र ठरवून पूर्वसंमती देण्यात आली होती अनेक लाभार्थ्यांनी यंत्र अवजारे खरेदी करून त्यांचे बिल व चलन अपलोड केले असून ते अनुदानाच्या प्रतीक्षेत होते मात्र उपलब्ध निधी अपुरा असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अनुदान वितरण रखडले होते
राज्य शासनाने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यापूर्वी सुमारे 200 कोटी रुपयांचे अनुदान वितरण करण्यात आले आहे उर्वरित 200 कोटी रुपयांची मागणी कृषी विभागामार्फत आराखडे करण्यात आली होती या मागणीच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने आता उर्वरित निधी पैकी पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे
अधिकृत जीआर पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता
या निधीच्या प्राधान्याने लाभ ज्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बिल व चलन अपलोड केले आहेत अशा लाभार्थ्यांना दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लवकरात त्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची अपेक्षा आहे कृषी यांत्रिकीकरण योजना ही राज्यातील अत्यंत लोकप्रिय योजना असून प्रत्येक शेतकऱ्याला योजनेत सहभागी व्हावे असे वाटत वाटते
आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे उत्पन्न खर्च कमी होऊन शेती अधिक कार्यक्षम होते मात्र अर्जाची संख्या प्रचंड असताना निधी तुलनेने कमी असल्यामुळे भविष्यात पात्र ठरणार्या अनेक शेतकऱ्यांना अनुदानासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे दरम्यान या योजनेबाबत किंवा महाडीबीटी संदर्भात अन्य माहितीचे अपडेट प्राप्त होताच शेतकऱ्या अधिकृत माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे धन्यवाद





