रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसे ॲड करावे आजच्या डिजिटल युगात अनेक शासकीय सेवा ऑनलाईन झाल्या असून त्यांना थेट फायदा सामान्य नागरिकांना होत आहे त्यामध्ये आता रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यासाठी तहसील कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही योग्य पद्धतीने अर्ज केल्यास ही प्रक्रिया अगदी सोपी आणि वेळ वाचवणारी ठरते या लेखामध्ये आपण रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करण्याची A ते Z पूर्ण प्रक्रिया सविस्तर समजून घेणार आहोत
रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करण्यासाठी कोणती वेबसाईट वापरावी
रेशन कार्ड मध्ये बदल किंवा नवीन नाव जोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे RCMS Mahafood (rcm.mahafood. gov. in) हीच वेबसाईट वापरून पब्लिक लोगिन द्वारे नागरिक स्वतः अर्ज करू शकतात
पब्लिक लोगिन साठी नवीन अकाउंट कसे तयार करावे
सर्वप्रथम Google वर RCMS Mahafood असे सर्च करा अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर sign in / register या पर्यायावर क्लिक करा तेथे office लॉगिन आणि public लॉगिन असे दोन पर्याय दिसतील तुम्हाला publish login निवडायचा आहे new user असल्यास register या पर्यायावर क्लिक करा I have valid ration card and l am Head of Family (HOF) हा पर्याय निवडावा आता रेशन कार्ड क्रमांक आरसी नंबर टाका
रेशन कार्ड क्रमांक कसा मिळवायचा
जर रेशन कार्ड क्रमांक माहिती नसेल तर Play Store मधून मेरा रेशन (Mera ration) हे ॲप डाऊनलोड करा ॲप ओपन केल्यानंतर आधार नंबर आणि OTP द्वारे लॉग इन करा लोगिन झाल्यानंतर तुम्हाला 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक दिसेल हाच नंबर RCMS वेबसाईट वापरायचा आहे
OTP वेरिफिकेशन आणि अकाऊंट क्रिएशन
रेशन कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येतो ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर नाव मराठी व इंग्लिश user ID, password नंबर मोबाईल नंबर व ई-मेल टाकून अकाऊंट तयार करा अकाउंट यशस्वीरित्या तयार झाल्यावर काँग्रॅच्युलेशन (congratulation) असा मेसेज दिसतो
रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करण्याची प्रक्रिया
Public Login मध्ये registered user म्हणून लगीन करा Head of Family (याच्या नावावर रेशन कार्ड आहे) त्याचेच Aadhar नंबर वापरून ओटीपी व्हेरिफाय करा लोगिन झाल्यानंतर डाव्या Ration Card Modification या पर्यायावर क्लिक करा तेथे Add member या बटणावर क्लिक करा
नवीन सदस्यांची माहिती कशी भरायची
नवीन ऍड करताना खालील माहिती भरावी लागते
- पासपोर्ट साईज फोटो 20 KB पर्यंत
- नाव नंबर (मराठी व इंग्लिश)
- वडीलाचे व आईचे नाव
- जन्मतारीख (आधार प्रमाणे)
- लिंक Gender
- नातेसंबंध Relation with Head of Family
- आधार नंबर
- व्यवसाय Occupation
- वार्षिक उत्पन्न
- कागदपत्रे Birth Certificate / Aadhaar/Marksheet /PAN/ Voter ID
- जात प्रवर्ग (General/SC/ST / OBC )
- अपंगत्व किंवा गंभीर आजार असल्यास माहिती
- ज्या ठिकाणी (स्टार मार्क) आहेत ती माहिती भरणे अनिवार्य आहे
अर्ज सबमिट केल्यानंतर पुढे काय
सर्व माहिती भरून Save व नंतर Confirm & submit Application आधार वर क्लिक करा आधार सबमिट होतास तुमचे रिक्वेस्ट तहसील कार्यालयातील निरीक्षणा कडे Inspector Inspector पाठवले जाते तुम्हाला Application number नंबर मिळतो साधारण 30 दिवसात नाव रेशन कार्ड मध्ये जोडले जाते त्या 30 दिवसात प्रक्रिया पूर्ण झाले नाही तर साइटवर दिलेल्या निरीक्षणाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा तक्रार नोंदवू शकता
निष्कर्ष रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्य नाव जोडणे ही प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाले असून योग्य माहिती आणि कागदपत्राच्या आधारे ही प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करता येते नवजात बालक लग्नानंतर जोडलेला सदस्य किंवा इतर कोणतेही कुटुंबीय सर्वांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे
हा लेख उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र





