जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून शासनाच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येते आहे यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली असली तरी आजही बरेच शेतकरी मदतीपासून वंचित आहे किंवा प्रत्यक्षात आहे अशा परिस्थितीत मदत व वाटपामध्ये पारदर्शकता यावी
कोणत्या क्षेत्रात शेतकऱ्याला किती मदत मिळाली आहे ती रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही हे शेतकऱ्यांना सहजपणे कळावे यासाठी लाभार्थी यादी प्रकाशित करा स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत लाभार्थी यादी प्रकाशित करणे मागील कारण बीड, जालना यासारख्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर गोळ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात एक महत्वाची बैठक घेण्यात आली होती
आणि प्रत्येक जिल्ह्याने मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी यादी जाहीर करावी असे आदेश देण्यात आले यापूर्वी यवतमाळ जळगाव बुलढाणा आदी जिल्ह्यांमध्ये याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या आता राज्यातील सर्वाधिक लाभार्थी संख्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याची लाभार्थी यादी देखील अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आली होत आहे
अहिल्या नगर जिल्ह्याची लाभार्थी यादी कुठे पाहावी
मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी पाहण्यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे Ahmednagar Maharashtra gov.in (अहिल्यानगर डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन) या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खालील प्रकारच्या याद्या पहाता येथील
- तालुकानिहाय लाभार्थी यादी
- नावानुसार लाभार्थी यादी
- KYC पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांची यादी
कोणकोणत्या तालुक्याच्या याद्या उपलब्ध आहेत
अहिल्या नगर जिल्ह्यातील पुढील तालुक्याच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत अहिल्यानगर, अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर आपण
आपल्याला त्या तालुक्याची यादी पाहायची आहे ती यादी डाऊनलोड करून PDF स्वरूपात ओपन करून सहज पाहता येते
पुढील अपडेट काय
अहिल्या नगर जिल्ह्यात अधिकारी कार्यालय उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाच्या आणि पारदर्शक त्यादृष्टीने स्वागताहान आहे शासनाने इतर सर्व जिल्ह्यात ही लवकरात लवकर लाभार्थी यादी प्रकाशित करण्याच्या सूचना दिल्या आहेत या काही जिल्ह्यांमध्ये अद्याप अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही 15 जानेवारीनंतर पुढील टप्प्यात वाटप होण्याचे संकेत आहे यासंदर्भात नवीन अपडेट आल्यास ती माहिती देखील वेळोवेळी आपल्या पर्यंत पोहोचली जाईल शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट तपासावी आणि आपले नाव लाभार्थी यादीत आहे का ते नक्की पहावे धन्यवाद





