Namo Shetkari update : नमो शेतकऱ्याचा 8वा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सम्मान निधि योजना च्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही योजना असून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ठराविक आर्थिक मदत दिली जाते सध्या या योजनेचा 8 व्या हप्त्या याबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहे असून अनेक शेतकऱ्यांसाठी ही मदत अत्यंत आवश्यक आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा हप्ता विचार करण्यात आला होता त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित होईल

अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात राज्यातील कृषी विभागामार्फत पीएम किसान अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नमो शेतकरी योजनेसाठी पातळी प्रक्रिया सुरू करण्यात आली यामागील मुख्य कारण म्हणजे पीएम च्या शेवटीच्या सुमारे 90 लाख 4241 शेतकऱ्यांचे लाभ मिळाला तर जवळपास 2 लाख 20 हजाराहून अधिक शेतकरी हात्या पासून वंचित राहिले हाताळणी करीत असताना अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आधार (सीडिंग) पूर्ण नसणे तसेच फार्मर आयडी जनरेट न झालेले असणे ही प्रमुख कारणे समोर आली यामुळे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान चा तसेच नमो शेतकऱ्याचा लाभ मिळू शकला नाही आशा परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासन व कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार केली असून त्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे

राज्य शासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहे की 10 जानेवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सीडींग करणे आणि फार्मर आयडी जनरेट करणे अनिवार्य आहे जे शेतकरी या मुदतीत या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांना हा सन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता मिळणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हात्याच्या वितरणा बाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी निधीची मागणी सादर करण्यात आली असून वित्त विभागाने मार्फत निधी वितरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे उपलब्ध माहितीनुसार 1780 ते 1800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय (GR) जारी केला जाण्याची शक्यता आहे हा निधी उपलब्ध झाल्यानंतर राज्य शासनाकडून तारीख निश्चित करून 8 वा हप्ता वितरित केला जाणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे

या सर्व प्रक्रियेतून एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते की ती म्हणजे फार्मर आयडीचे वाढते महत्त्व सध्या पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे इतकेच नव्हे तर खरीप 2025 पासून पिक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई, पिक कर्ज, कर्जमाफी तसेच महाडीबीटी mahadbt Yojana वरील सर्व योजना या फार्मर आयडीच्या आधारेच दिल्या जाणार आहे त्यामुळे फार्मर आयडी नसल्यास शेतकरी भविष्यात अनेक शासकीय योजनेपासून वंचित राहू शकतात हे गणित पाहता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या मोठा आधार आहे मात्र या योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी Aadhar shading आणि फार्मर आयडी ही दोन्ही कामे वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे योग्य कागदपत्रे आणि नोंदणी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनाच येणारा काळात सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे

Leave a Comment