राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आला आहे 7 जानेवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 2017 च्या कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे 2017 ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत कर्जमाफी जाहीर केली होती मात्र या योजनेतून लाखो शेतकरी विविध कारणांमुळे वंचित राहिले अपात्र शेतकरी वगळता अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता
शेतकऱ्यांचा न्यायालयाने लढा आणि शासनावर आलेली जबाबदारी
2017 च्या कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली या प्रकरणांमध्ये न्यायालयाने शेतकर्यांच्या बाजूने निकाल दिला या निकालाच्या पार्श्वभूमीवर 2022 पासून राज्य शासनाने संबंधित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली होती 2025 मध्ये आणि खटल्याचे निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागले असून 6 आठवड्याच्या आत कर्जमाफी करायचे आदेश शासनाला देण्यात आली होती
5.90 लाख शेतकरी अजूनही प्रत्यक्ष
हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार 5 लाख 90 हजार हून अधिक शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत यासाठी सुमारे 5900 ते 6 हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे याच पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांनी ही कर्जमाफी लवकरच केली जाईल अशी ग्वाही दिली होती
500 कोटींच्या निधीला अखेर मंजुरी
हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी केवळ 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती अखेर आता हाच निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे
या निधीचा वापर खालील बाबीसाठी केला जाणार आहे
- न्यायालयीन निकाल असलेल्या शेतकऱ्यांना डाटा संलग्न
- पात्र शेतकऱ्यांची माहिती अद्यावत करणे
- कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्ष वितरण
- प्रशासकीय व कार्यालया कर्ज
कर्जमाफीची प्रतीक्षा सुरू होणार
निधी उपलब्ध झाल्यामुळे आता प्रलंबित कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विशेषता यांच्या प्रकरणावर न्यायालयाने दिले आहेत ते तसेच जे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता वाढले आहे
पुढील अपेक्षा जून 2026 मध्य पूर्ण कर्जमाफी?
एकूण कर्जमाफी सध्या केवळ पाचशे कोटी रुपये उपलब्ध झालेले असले तरी येणार्या जून 2026 मध्ये जाहीर होणाऱ्या पुढील कर्जमाफी सोबतच उर्वरित शेतकऱ्यांनाही कर्ज माफी पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
जीआर कुठे पाहता येईल या निर्णयासंदर्भात शासन निर्णय GR maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
निष्कर्ष. सध्यातरी 2017 च्या कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरला आहे प्रत्येक लाभ कधी मिळतो याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे





