नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पीएम किसानच्या धरतीवरती राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना आणि याच योजनेचा आठवा हप्ता कधी
वितरित केला जाणार
- या हप्त्याच्या संदर्भातील काही अपडेट आहे का?
- योजना बंद करण्यात आलेली आहे का?
- सरकार यापुढे याचे हप्ते वितरित करणार नाही का?
- असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारले जातात
आणि याच्या संदर्भातील काही माहिती आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो एकंदरीत
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम
किसान योजनेच्या धरतीवरती राबवली जाते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर त्याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी हप्ता वितरित केला जातो.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित झाला आणि याच्यानंतर आता तब्बल 2 महिन्याचा कालावधी लोटला तरी सुद्धा आणखीन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील कुठलीही
प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही
आणि याच पार्श्ववती खरंच शेतकऱ्यांशी सरकार
दुजाभाव करतय का? शेतकऱ्यांशी आवश्यक
असलेल्या निधी वितरणामध्ये कुठेतरी तडजोड
केली जाते का? असे अनेक सारे प्रश्न या ठिकाणी पडले जात आहे आणि साहजिकच या विरोधात एक रोषाचं वातावरण देखील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.
मित्रांनो नगरपालिका नगर पंचायतीच्या निवडणुका सुरू असताना या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या फायनल करण्यात आल्या आणि या आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ या
योजनेच्या हप्त्याच वितरण केलं जाईल अशा
प्रकारच्या शक्यता देखील वर्तवण्यात येत होत्या.
साधारणपणे राज्यातील 90 लाखाहून अधिक
शेतकऱ्यांना 1800 कोटी च्या आसपासच वितरण
हे केलं जाईल अशा प्रकारच्या शक्यता देखील
वर्तवण्यात आलेल्या होत्या आणि याच्यासाठी
आवश्यक असलेला निधी त्याच्या संदर्भातील
तरतुदी याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेलं होतं. याच्यातच आपण पाहिलं होत हिवाळी अधिवेशन पार पडलं हिवाळी अधिवेशनामध्ये
75 हजार कोटीच्या पूर्वी मागण्या सादर
करण्यात आल्या परंतु नमो शेतकरी योजनेच्या
हप्त्याच्या वितरणासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची याच्या माध्यमातून तरतूद करण्यात आलेली नाही किंवा एखादा (GR) काढून या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक असलेला निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली
नाही.
मित्रांनो एकंदरीत 1800 कोटीच्या आसपासची रक्कम ही हफ्त्याच्या वितरणासाठी आवश्यक आहे. हा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी द्यावी लागेल आणि हा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर पुढे या योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो.
आता राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू आहे परंतु या आचारसंहित्याचा या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणामध्ये कुठल्याही प्रकारचा अडसर येत नाही. कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्षेत्राबाहेरील हे लाभार्थी
असल्यामुळे अर्थार्थी आचारसंहिताचे त्याला
बंधन देखील लागत नाही.
लवकरच म्हणजे साधारणपणे एक दोन आठवड्याच्या आत कधीही हप्ता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर होऊ शकते आणि याच्यापूर्वी जर या निधी वितरणाचा जीआर आला नाही तर मात्र शेतकऱ्याला आणखीनही एक महिना वाट पाहावी लागू शकते. त्याच्यामुळे साधारणपणे जर या पहिल्या आठवड्यामध्ये निधी वितरणाचा जर जीआर आला तरच शेतकऱ्यांना
lncome Certiflcate online Application 2026 : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कागदपत्रे आणि फायदे
नवीन वर्षात धमाका! बजाज चेतक ₹४५,००० ने स्वस्त 32 लिटर बूट स्प्रेस आणि १९० कमी रेंजसह
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय राष्ट्रीयकृत बँकेने पीक कर्ज मर्यादा वाढवली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा थकीत हप्ता अखेर खात्यात जमा होण्यास सुरुवात
या जानेवारीच्या महिन्यामध्ये हा नमो शेतकरीचा हप्ता मिळू शकतो. जीआर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा त्याच आठवड्यामध्ये
सुद्धा हप्त्याच वितरण केलं जाऊ शकतं परंतु अद्याप निधीची तरतूद नाही. अद्याप त्याच्या निधी वितरणाचा जीआर नाही किंवा त्याच्या संदर्भातील कुठलेही अधिकृत अपडेट सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून दिले जात नाही.
त्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाच वातावरण निर्माण झालेल आहे. पुढे आणखीन एक
महिन्याच्या कालावधीभर या निवडणुका सुरू
राहणार आहेत आणि या ग्रामीण भागातील
निवडणुका लागण्यापूर्वीच शासनाच्या माध्यमातून या हप्त्याच वितरण केलं जावं अशा प्रकारची अपेक्षा देखील मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
एकंदरीत जर आपण पाहिलं तर अतिवृष्टीची अनुदान जे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून वितरित केले जातील सांगण्यात आलं डीबीटी च अनुदान थकीत आहेत कुशलची जी बिल आहेत ती देखील थकीत आहेत आणि आता याच्यामध्ये या नमो शेतकरी या सारख्या योजनेच्या हप्त्याचा निधीन वितरण करण्यात आल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये दिरंगाई केल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये
अतिशय मोठ्या प्रमाणात रोषाच वातावरण आहे
आणि कुठेतरी सरकारन जाणून घेऊन या हप्त्याच वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी हीच अपेक्षा आहे. धन्यवाद!





