NFOM Scheme update :राष्ट्रीय खाद्यातील अभियान 2025 अंतर्गत बियाणे वाटपाबाबत महत्त्वाचा अपडेट

NFOM (National Food Oil Mission) राज्यातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय खाद्यातील अभियान 2025-26 अंतर्गत अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना अंतर्गत उन्हाळी भुईमूग आणि बियाण्याच्या वाटपासाठी अखेर निधी वितरणास मंजुरी देण्यात आले आहे

त्यामुळे अनेक दिवस असून या बियाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील सांगली,सातारा,कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर अहमद नगर,धुळे,पुणे, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये भुईमूग बियाण्यासाठी पूर्वीच मंजुरी देण्यात आली होती योजनेत शेतकऱ्यांना किमान 20 गुंठे क्षेत्रासाठी म्हणजेच सुमारे 60 किलो बियाणे आणि कमाल एक हेक्टर क्षेत्रासाठी जास्तीत जास्त 100 किलो बियाणे देण्याची तरतूद करण्यात आली होती

यासाठी शासनाने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले होते आणि राज्य राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते मात्र अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बियाणे वाटप प्रतीक्षेत होते आताही प्रत्येक शासन संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे 29 डिसेंबर 2025 रोजी केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा वितरित करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्ग या तिन्ही प्रवर्गासाठी मिळून सुमारे 69 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे

हा निधी केवळ बियाणे वाटप पुरताच मर्यादित नसून योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपकरणासाठी वापरण्यात येणार आहे यामध्ये भुईमूग बियाणे वरील अनुदान शेतीशाळा शेतकर्याचे प्रशिक्षण कार्यक्रम तेल घाणा यासारख्या मूल्यवर्धित उपक्रमाचा समावेश आहे यामुळे तेलबिया उत्पादन वाढविण्यास सोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा ही मदत होणार आहे

निधी मंजूर झाल्यामुळे आता बियाणे वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून 30 डिसेंबर 2000 25 पासून प्रत्यक्षात सुरू होऊ शकते असे संकेत मिळत आहे वितरणासाठी टोकण पद्धत अधिकृत विक्रेते किंवा कृषी विभागामार्फत थेट वाटप अशा विविध माध्यमाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे

याबाबतचे अधिकृत आदेश आणि सूचना लवकरच प्रसिद्ध केल्या जातील या योजनेची संबंधी शासन निर्णय (GR) maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी तो पाहावा असे आवाहन करण्यात येत आहे पुढील काळात बियाणे वाटप टोकन व्यवस्थापन किंवा विक्रेते बाबत जे काही नवीन अपडेट येतील ते वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे

एकूणच निधी उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील अभियानाला नवसंजीवनी मिळाली असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आगामी उन्हाळी हंगामात मोठा आधार ठरणार आहे या वेळी बियाणे मिळाल्यास उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

Leave a Comment