मनरेगा अंतर्गत फळबाग, वृक्ष व फुलपिक लागवडीबाबत 23 डिसेंबर 2025 चा महत्वाचा शासन निर्णय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत फळबाग लागवड वृक्ष लागवड व फुलपीक लागवडीसंदर्भात दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी शासनाने एक महत्वाचा जीआर काढला आहे या योजनेअंतर्गत सलग शेतावर शेताच्या बांधावर तसेच पडीत जमिनीवर फळबाग वृक्ष व फुल पिकाची लागवड केली जाते यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता पूर्वी एक समिती कार्यरत होती मात्र या समितीच्या कृषी विभागातील तांत्रिक अधिकाराचा समावेश नव्हता फळबाग व वृक्ष लागवडीसाठी रोपांची निवड, खड्डे खोदणे, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि मार्केटिंग या सर्व बाबी कृषी विभागाच्या कार्यक्षेत्रात येतात त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने समितीमध्ये बदल केले आहेत

आता जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या नियुक्त सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे तसेच मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत नरेगा जिल्हा परिषद यांचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे या बदलामुळे फळबाग आणि वृक्षलागवडीच्या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार असून लाभार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या योग्य मार्गदर्शक मिळणार आहे तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळण्यास मदत होणार आहे

मनरेगा अंतर्गत शेततळे योजना बंद लाभार्थी निवड समिती रद्द

23 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला दुसरा महत्वाचा शासन निर्णय व मनरेगा अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजने बाबत आहे अनेक शेतकऱ्यांना असे वाटत आहे की मनरेगा मधून शेतक-यांसाठी अधिक अनुदान मिळते मात्र सध्या ही योजना मनरेगाअंतर्गत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे यापूर्वी 9 एप्रिल 2025 रोजी शेततळे योजनेसाठी लाभार्थी निवड करण्यात एक समिती गठीत करण्यात आली होती या समिती अभ्यास व निरीक्षण केल्यानंतर शासनाने मनरेगा अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेली लाभार्थी निवड समिती आता रद्द करण्यात आली आहे सध्या शेततळ्याचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्म स्कीम फोटोवर किंवा पोखरा (PoCRA) योजनेच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे

या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून त्याद्वारे लाभार्थी निवड आणि अनुदान वितरण केले जात आहे म्हणूनच आता मनरेगा अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी कोणते ही समिती किंवा प्रक्रिया अस्तित्वात नाही शेतकऱ्यांनी याबाबत गैरसमज करून न घेता योग्य योजनेच्या माध्यमातून अर्ज करावा हे दोन्ही शासन निर्णय maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून घ्या फळबाग व वृक्ष लागवडीच्या योजना अधिक प्रभावी होतील आणि शेततळ्यास संदर्भातील स्पष्टता शेतकऱ्यांना मिळेल

Leave a Comment