खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान खरीप हंगाम 2025 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे अनेक भागांमध्ये सतत झालेल्या पावसामुळे पिके पाण्यात गेली व उभे पिके आडवी झाली आणि उत्पादनात मोठी घट झाली होती सोयाबीन ज्वारी कापूस बाजरी तूर यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण पीक वाया गेले आहे या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम 2025 मधील पैसेवारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण उत्पादक उत्पादनातील गट अधिकृत रित्या सिद्ध करण्यास ती अंतिम पैसेवारी हा मुख्य आधार मानला जात आहे
अंतिम पैसेवारी का आहे कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी महत्त्वाची
अंतिम पैसेवारी ही पीक कापणी प्रयोगाच्या आधारे निश्चित केली जाते या प्रयोगांमधून प्रत्येक उत्पादन किती झाली ती याचा अंदाज घेतला जातो खरीप 2025 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना किंवा नुकसान भरपाई कर ठरवताना अंतिम पैसेवारी हा एक महत्त्वाचा ठरणार आहे पिक विमा च्या थेट संबंधित अंतिम पैसेवारी नसला तरी पिक विमा देताना वापरला जाणारा दाट हाच पीक कापणी प्रयोग आतून येतो यामुळे दोन्ही ठिकाणी वापरली जाणारी माहिती एकाच स्रोतावर आधारित असल्यामुळे अंतिम पैसेवारी ची आकडेवारी अत्यंत निर्णायक ठरते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी येण्याचे संकेत मिळत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे
छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्याची जाहीर अंतिम पैसेवारी
साधारणपणे 15 डिसेंबरपासून अंतिम पैसेवारी जाहीर होण्यात सुरुवात होते आणि काही ठिकाणांमध्ये जिल्ह्यांमध्ये 31 डिसेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होते याच दरम्यान छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्ह्याचे अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आले आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या सरासरी अंतिम पैसेवारी 47. 81 पैसे इतकीच असून ती 50 पैशापेक्षा कमी आहे तालुकानिहाय पहिले असता छत्रपती संभाजी नगर, पैठण, फुलंब्री, वैजापूर, खुलताबाद, गंगापूर, कन्नड आणि सोयगाव या सर्व तालुक्याची पैसेवारी 46 ते 49 पैसे दरम्यान आहे जालना जिल्ह्यातील परिस्थितीही गंभीर असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे जालना जिल्ह्यात एकूण 971 गावे असून त्यापैकी 965 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे
बदनापूर जालना भोकरदन जाफराबाद परतूर मंठा अंबड आणि घनसावंगी यादी सर्वजण तालुक्यातील गावांची पैसेवारी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे येत्या काळामध्ये इतर जिल्ह्याची ही अंतिम पैसेवारी जाहीर होणार असून त्या जिल्ह्यामध्ये पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी पिक विमा आणि इतर सवलती मिळण्याची मोठी शक्यता आहे यामुळे खरीप हंगाम 2025 अंतिम पैसेवारी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक आहे





