राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आले आहे खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत सोयाबीन मूग उडीद आणि धान पिकांच्या हमीभावाने खरेदी साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त उपकरणातून ही योजना राबविण्यात येत आहे
हमीभावाने खरेदी साठी मंजुरी
केंद्र शासनाने सोयाबीन मूग आणि उडीद या पिकांचे हमीभाव खरेदी करण्यास मंजुरी दिले आहे यामध्ये पिक पुढील प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे
सोयाबीन 18,50,700 मेट्रिक टन
मुग 33 हजार मेट्रिक टन
उडीद 3,25,680 मेट्रिक टन
सोयाबीन साठी 5328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे ही खरेदी 15 नोव्हेंबर 2025 पासून पुढील 90 दिवसांपर्यंत म्हणजे साधारणपणे 12 ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत केली जाणार आहे
नोंदणी कालावधी आणि संस्था
शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणी 30 ऑक्टोंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी नाफेड एनसीसीएफ आणि एन एम एल या संस्थांना जबाबदारी देण्यात आली आहे
ऑनलाइन नोंदणी कुठे आणि कशी करायची
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ई समृद्धी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे सध्या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असून काही दिवसात सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांची पर्याय उपलब्ध होतील नोंदणी करताना फार्मर आयडी आवश्यक असणार आहे फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांची जमीन पीक पेरा, सातबारा, आणि इतर माहिती स्वयंचलितपणे प्राप्त होईल त्यामुळे सातबारा वैकल्पिक राहील
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
- फार्मर आयडी असल्यास
- आधार कार्ड
- बँक पासबुक (कॅन्सल चेक)
- चालू हंगामाचा सातबारा आणि पीक पेरा नमुना 8 अ
- मोबाईल नंबर जर फार्मर आयडी नसेल तर वरील कागदपत्राच्या आधारे ही ऑनलाईन नोंदणी करता येईल
धान नोंदणी प्रक्रिया 2025-26
खरीब हंगामातील धान पेरणी पिकासाठी देखील नोंदणी ची सुरुवात झाली आहे नोंदणी ची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आले आहे खरेदी केंद्रावर प्रत्येक नोंदणी करताना शेतकऱ्यांना बायोमेट्रिक ओळख देणे आवश्यक असेल यामुळे बोगस नोंदणी टाळली जाणार असून फक्त पात्र आणि प्रत्यक्षात शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतील यासाठी भविष्यात बोगस करणाऱ्यांची शक्यता शासनाच्या विचारधन आहे
बायोमेट्रिक नोंदणी का महत्वाची
पूर्वी काही व्यापारी आणि एजंटांनी शेतकऱ्यांच्या नावावर आणि हमीभावाने खरेदी करून दुबारा नफा मिळवला होता या प्रकरणांना आळा घालण्यासाठी यंदा बायोमेट्रिक वेरीफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे खरोखरच पिक पेरा पीक घेणारा शेतकरी लाभ येईल याची खात्री राहील
खरेदी केंद्र व प्रत्यक्ष नोंदणी
शेतकऱ्यांना जवळपास पणन महासंघ अ वर्ग किंवा ब वर्ग संदर्भात संस्थेमध्ये तसेच धान खरेदी केंद्रावर प्रत्येक उपस्थित राहून नोंदणी करता येईल नोंदणी दरम्यान शेतकऱ्यांचा लाइव फोटो बायोमेट्रिक पाताळणी आणि कागदपत्र तपासणी केली जाईल पुढील अपडेट सध्या ही समृद्धी पोर्टलवर केवळ रजिस्ट्रेशन सुरू आहे लवकरच सोयाबीन मूग उडीद हमीभाव योजना 2025 26 हा पर्याय ची नोंदणी सुरू होईल त्यात यावर शेतकऱ्यांना पुढील मार्गदर्शन आणि सविस्तर माहिती देण्यात येणार आहे
निष्कर्ष : खरीप हंगाम 2025 26 साठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे सोयाबीन मूग उडीद आणि धान पिकांसाठी आणि हमीभाव खरेदी ही योजना शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करुन आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी ही समृद्धी पोर्टलवर भेट द्या





