मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली तर सकाळी हवेत गारवा हे जाणवतंय उद्यापासून राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यातील काही भागात उद्यापासून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे
उद्या विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बुधवारपासून मात्र राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे
कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी जालना परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात वीज आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या माध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे
गुरुवारी आणि शुक्रवारी हे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने व्यक्त केली आहे