राज्यामध्ये यंदाचा ऊस गाळप हंगाम दिवाळीच्या मुहूर्तावरच सुरू होणार आहेत हंगाम नेहमीपेक्षा 15 दिवस आधी सुरू होण्याची शक्यता आहे यंदा उसाचे चांगले उत्पादन अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे केंद्र सरकारने ऊस उत्पादकांसाठी किमान हमीभाव एफ आर पी जाहीर केला आहे 2025-26 हंगामासाठी 10.25 टक्के उताऱ्यासाठी प्रतिटन 3 हजार 550 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे
त्यापुढील प्रत्येक 1% उताऱ्यासाठी 346 रुपये अधिक मिळतील व उतारा घटतल्यास दर कमी होऊन प्रति टन 346 रूपये कापत होईल तसेच 9.5% पेक्षा कमी उताऱ्यासाठी किमान दर तीन हजार 461 रुपये प्रति टन असा निश्चित केला आहे गाळाप परवान्यासाठी साखर कारखान्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असून ही प्रक्रिया 1 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे
अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे सर्वांना परवाना अधिकार्यांकडून परवानगी मिळाल्याशिवाय गाळप सुरू करता येणार नाही विनापरवाना सुरू केल्यास संबंधित कारखान्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्तांकडून देण्यात आला आहे





