Market update Maharashtra : डाळिंब तेजीत मूग गहू केळी काय आहे मुगाचे दर पहा..

डाळिंबामध्ये उठाव कायम

वांगी बाजारातील आवक कमीच आहे तर मागील महिना भरा मध्ये झालेल्या पावसाचा डाळिंब पिकावर फटका बसला त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत डाळिंबाला चांगली मागणी असली तरी पुरवठा कमी आहे त्यातही गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे त्यामुळे डाळिंबाचे भाव तेजीत आहेत डाळिंबाला बाजारात सरासरी सात हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला आहे डाळिंबाची बाजारातील आवक पुढील काळात मर्यादितच राहू शकते त्यामुळे दरही तेजीत राहतील असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

मुगाचे भाव सध्या दबावात

मुगाला बाजारातील हमी भावा पेक्षा खूपच कमी दर मिळत असल्यामुळे देशातील वाढलेले उत्पादन आणि वाढती आयात त्याचा दरावर दिसून येत आहे तसेच इतर कडधान्याचे भावही कमी झाले आहेत त्यामुळे मुग दबावात आहे दुसरीकडे मुगाला उठाव चांगला उठाव चांगला आहे मात्र पुरवठा चांगला असल्याने दर कमी आहेत सध्या मग प्रतिक्विंटल सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे पुढील काळात मुगाला आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दारात चढ-उतार होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

केळीचे दर तेजीत

बाजारात सध्या केळीला चांगला दर मिळत आहे बाजारातील केळीला चांगला उठाव असल्यामुळे दरही चांगला आहे मात्र बाजारातील आवक कमीच आहे त्यामुळे केळीचे दर तेजीत आहेत किरकोळ बाजारात केळी 30 रुपये ते 70 प्रति डझन विकली जातील तर खाऊ बाजारात सध्या केळीला 1800 ते 2200 रुपये च्या दरम्यान भाव मिळत आहे पुढील काळात केळीची आवक काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील जाणकार व व्यापारी व्यक्त करत आहेत

उडदाच्या भावात स्थिरता

वाढती आयात आणि देशातील बाजारातील आवक त्यामुळे उडदाचे भाव दबावात आहेत सध्या उडदाला हमी भावापेक्षा कमी 6 हजार ते6 हजार 500 रुपये कमी भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत बाजारातील उडदाच्या आवक पुढील दोन महिने कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र आयातही सुरूच आहे त्या आयातीमुळे दर दबावात आहेत बाजार ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते उडदाच्या भावात पुढील काळात चढ-उतार दिसू शकतात असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

गव्हाचे दर स्थिर

देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टॉक लिमिट यामुळे गावाचे भाव लावले आहेत बाजारातील गावाची आवकही कमी होत आहे गावाचे भाव मागील महिनाभरात जवळपास दोनशे रुपयांनी कमी झाले आहेत सध्या गहू 2 हजार 200 ते 2 हजार 500 रुपये च्या दरम्यान दिला जात आहे पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे मात्र पुढील महिनाभरानंतर सणांची मागणी सुरू होईल त्यामुळे गावाला उठाव राहील या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment