देशामध्ये सध्या 2024 – 25 या वर्षात बागायती पिकाचे उत्पादन लक्षणीयरित्या वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकताच दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठीचा दुसरा आगाऊ उत्पादन अंदाज जाहीर केला असून त्यानुसार बागायती उत्पादन 2023 – 24 मधील 3,547. 44 लाख टनांवरून 3.66 % टक्क्याची वाढून 3,677. 24 लाख टनावर जाऊ शकते
कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार उत्पादन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये 1. 36 टक्क्यांनी वाढून 1,145. 10 लाख टनावर पोहोचण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे भाजीपाला उत्पादनात 6 6% इतकी वाढ झाली असून देशातील भाजीपाला पिकाचे उत्पादन 2,196.74 लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर भाजीपाला पिकांमध्ये कांदा आणि बटाटा उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली आहे तर 2023 – 24 मध्ये कांद्याचे उत्पादन 242.67 लाख टन होते
तर आता 307.73 लाख टनापर्यंत जाऊ शकते बटाट्याचे उत्पादन देखील 601. 75 लाख टन राहण्याचा अंदाज आहे जे मागील वर्षाच्या तुलनेत 31.21 लाख टनांनी अधिक आहे दुसरीकडे टोमॅटो उत्पादनात थोडी घट नोंदवली गेली असून टोमॅटो उत्पादन 213.23 लाख टणावरून घसरून 207. 52 लाख भरून येण्याचा अंदाज आहे
मसाल्याच्या उत्पादनामध्ये काहीशी नरमाई दिसू आली
दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मसाल्याचे उत्पादन 123. 70 लाख टन राहण्याचा अंदाज असून हे दोन हजार तेवीस-चोवीस मधील 124. 84 लाख टनांपेक्षा कमी आहे हवामानातील अनिश्चितता आणि काही भागातील पिके फेरबदल हे यामागील संभाव्य कारणे मानले जात आहे बागायती पिकाखालील एकूण क्षेत्रफळ दोन हजार तेवीस-चोवीस मध्ये 290. 86 लाख हेक्टर होते जे आता वाढून 292.67 लाख हेक्टरवर आले आहे त्यावरून शेतकऱ्यांना बागायती पिकांकडे वाढता कल स्पष्टपणे दिसून येतो