Monsoon update : राज्यामध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील अनेक भागात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील यवतमाळ वर्धा वाशिम नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे

मराठवाड्यातील धाराशिव नांदेड लातूर हिंगोली बीड परभणी जालना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह विजा आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे

विशेषता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवार तर सातारा जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार हे दिवस विजेच्या कडकडाटासह अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे

कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे विशेष सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार आणि रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार व शनिवार हे दिवस विजा आणि मेघगर्जनेसह अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment