मित्रांनो तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक खाता लिंक आहे ते फक्त आपण दोन मिनिटात मोबाईल मधून घरबसल्या चेक करू शकतो कारण आता आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे खूपच गरजेचे आहे जर तुम्ही एखाद्या शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्हाला यापुढे घ्यायचा आहे तर हे शासनाचे पैसे तुमच्या आधार कार्ड ला जी बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंट मध्ये तुमचे पैसे येत असतात.
जसं की लाडका भाऊ योजना लाडकी बहिणी योजना किंवा पीएम किसान योजना अशा प्रकारे ज्या पण शासनाच्या योजना आहेत त्या योजनाचे अनुदान जर तुमच्या बँक अकाउंट मध्ये मिळवायचे असेल तर तुमच्या आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे तर हे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डची लिंक आहे का नाही किंवा कोणता अकाउंट लिंक आहे हे कशाप्रकारे चेक करायचं आपण बघणार आहोत.
येथे क्लिक करून वेबसाईट वरती जा
तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगल वरती यायचं आहे माय आधार लॉगिन अशा प्रकारे सर्च करायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल त्यावर क्लिक करून ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर लॉगिन नावाचा ऑप्शन तुमच्या समोर दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे. लॉगीन झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात खाली स्क्रोल करायचा आहे आणि खाली तुम्हाला बँक अकाउंट सीडींग स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे
आणि तुमच्यासमोर कोणती बँक अकाउंट तुमच्या आधार कार्ड ची लिंक आहे हे बघायला मिळेल त्या बँकेचे नाव तुमच्यासमोर तिथे दाखवले जाईल आणि त्या बँकेच्या अकाउंट मध्ये जे पण काही शासनाचे अनुदान आहे डीबीटी द्वारे मिळणार असेल ते डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल