मित्रांनो (Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 Update) संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना असेल या योजनेमध्ये सरकारने मोठा बदल जो आहे तो केलेला आहे आता जे काही तुम्हाला पैसे मिळतात जे काही अनुदान मिळतं ते आता डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला हे काम जे आहे.
सरकारने ही नोटीस सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये आता जे काही जिल्हाधिकारी आहेत त्यांना ही पाठवण्यात आलेली आहे इथे सांगण्यात आलेले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करायचा आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर जे काही लाभार्थी आहेत त्यांचं आधार कार्ड हे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संलग्न करून घ्यायला सांगितला आहे म्हणजे लवकरात लवकर आता जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न इथे सरकार करणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना जे काही अर्थसाहयाचे वितरण आहे हे डीबीटी पोर्टल द्वारे करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि त्यानुसारच सगळे जे काही जिल्हे आहेत ते इथे त्यांनाही जी काही नोटीस आहे ती पाठवण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर जे काही आधार संलग्न आहे ते करण्यात सांगण्यात आलेला आहे.
डीबीटी म्हणजे नक्की काय आहे
(Direct Benefit Transfer) डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे अगोदर जे काही तुम्हाला आत्तापर्यंत पैसे येत होते संजय गांधी जी असतील श्रावणबाळ निवृत्तीवेत योजनेची असतील हे जे पैसे आहेत ते तुम्हाला बँकेमध्ये येत होते आणि तुम्हाला बँकेत पैसे काढायला जायला लागायचा तर भरपूर असे प्रॉब्लेम येत होते आणि आता डीबीटी द्वारे म्हणजेच काय होणारे जे काही तुमचा आधार कार्ड आहे त्या आधार कार्डशी जी काही बँक संलग्न आहे तर हे NPCI (National Payments Corporation of India) जी काही बँक लिंक असेल तिथे पैसे जमा होते.
म्हणजे जे काही बाकीच्या योजना आहेत जसे की पीएम किसान योजना आहे किंवा दुसऱ्या योजना असतील महाडीबीटीच्या योजना असतील या सर्वांचे काही पैसे आहेत ते कुठे येतात तर आधार संलग्न जे काही बँक आहे तिथे जातात तर इथून पुढे सुद्धा आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार म्हणजे आधार कार्ड ला जी बँक लिंक आहे तिथे पैसे जाणार आणि तुम्ही ते पैसे अंगठ्याने कुठेही तुम्ही ते काढू शकता.
तुम्हाला बँकेतच जाऊन पैसे काढावे असा काही नियम नाही तुम्ही डीबीटी द्वारे पैसे तुमच्या बँकेत आले म्हणजे तुम्ही अंगठ्याने ते पैसे कुठेही काढू शकतात त्यालाच आपण डीबीटी (National Payments Corporation of India) असे म्हणतो.
- आता लाभार्थ्या काय काय करायचं आहे म्हणजेच जर तुम्ही पेन्शन घेता जे काही अनुदान घेता तर लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित जमा आहेत का नाही हे चेक करून घ्यायचे आहे.
- मध्ये कागदपत्र सुद्धा मागितली आहेत तर तुम्ही आत्तापर्यंत कागदपत्रे दिली नसतील तर आपली कागदपत्रे जे आहे ते लवकरात लवकर जमा करा.
- आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही काम करायचे ते म्हणजे ज्या ठिकाणी बँक आहे तुमचे कुठेही बँक असू द्या त्या बँकेमध्ये आपलं डीबीटीला आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करायचा आहे
कागदपत्रांमध्ये तुमचं आधार कार्ड देणे गरजेचे आहे तसेच तुमचा मोबाईल क्रमांक असेल तसेच तुमचं जे काही उत्पन्नाचा दाखला वगैरे असेल ही जी काही माहिती आहे हे तुम्ही तुमच्या शेजारील तलाठी ऑफिसमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये जी काही माहिती आहे ती जमा करून घ्यायची जिथे केवायसी चालू असेल ज्या जिल्ह्यांमध्ये येथे जाऊन आपली केवायसी करून घ्यायची आहे जे काही हयात असलेलाच जे काही प्रमाणपत्र आहे तिचा दाखला म्हणतो तो भरून सुद्धा द्यायचा आहे.
लक्षात ठेवा सगळ्या बँकेमध्ये तुमचा आधार कार्ड लिंक असतं पण ज्या बँकेमध्ये डीबीटीला आधार कार्ड लिंक असेल तिथेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणून लक्षात ठेवा एखाद्या बँकेमध्ये जाऊन तिथे विचार ना करा की आमच्या खात्याला डीबीटी एनपीसीएलला (NPCI) आधार कार्ड लिंक आहे का ज्या बँकेमध्ये डीबीटी आधार कार्ड लिंक असेल तिथेच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते इथेच जमा होतील ही गोष्ट एक लक्षात ठेवा तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती.
संजय गांधी निराधार योजना लाभ मिळण्यासाठी अर्ज करा
संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना लाभ मिळण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन माहिती घेऊन या योजनेसाठी आपण अर्ज करू शकतो या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट.
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- पॅन कार्ड
- जेष्ठ नागरिक कार्ड
- वयाचा दाखला
- मोबाईल नंबर
- उत्पन्नाचा दाखला
- मतदान कार्ड
जे काही कागदपत्रे आहेत ते लवकरात लवकर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये जमा करावे आणि ही माहिती आपल्या मित्रना शेयर करा