DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची खुष खबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, शासन निर्णय जाहीर.DA Hike Employee 2026

DA Hike Employee 2026: आज हाती आलेल्या शासन निर्णयानुसार आता महागाई भत्त्यात वाढ करणयाचा निर्णय झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर राज्याच्या सरकारनेही आता महागाई भत्ता वाढवला आहे.

राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्यात म्हणजेच डीएमध्ये २ टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने १ जानेवारी २०२६ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर, आता त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केल्याचा शासन निर्णय (GR) आज निर्गमित केला आहे.

महागाई भत्ता ६० टक्क्यांवर

या नव्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५८ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर पोहोचला असून, वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही ही वाढ लागू करण्यात आली असून, १ जानेवारी २०२६ पासून ही सुधारित दरवाढ लागू होणार आहे.

मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर’

राज्यातील शासकीय कर्मचारी संघटनांकडून गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी लावून धरली जात होती. अखेर सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्याने कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात पदनिहाय आणि वेतन श्रेणीनुसार लक्षणीय वाढ दिसून येणार आहे.

नव्या शासन निर्णयानुसार, ६० टक्के दराने मिळणाऱ्या या महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशाला आता चांगलीच उभारी मिळणार असून पेन्शनधारकांच्या खात्यातही वाढीव रक्कम जमा होणार आहे. महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ एका ‘बूस्टर’ प्रमाणे ठरणार आहे.

अंमलबजावणीचे आदेश

दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले असून, आगामी वेतन देयकासोबत ही थकबाकी आणि वाढीव पगार कर्मचाऱ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय स्तरावर या हालचालींना वेग आला असून, लाडक्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. आता या वाढीव डीएमुळे घरगुती बजेट सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी मदत मिळणार असून, सरकारी तिजोरीवर याचा अतिरिक्त भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Comment