DigiLocker SSC Marksheet Download: दहावीचा निकाल लागताच वेबसाईट क्रॅश झाल्यास टेन्शन नको! डिजीलॉकरवर ‘या’ सोप्या पद्धतीने पाहा मार्कशीट

Maharashtra SSC Marksheet Download on DigiLocker: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा (SSC) निकाल आज, ८ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर होत आहे. राज्यातील १६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार असून, अधिकृत संकेतस्थळांसह डिजीलॉकरवरही निकाल पाहता येईल. मार्कशीट डाऊनलोड करण्याची सविस्तर प्रक्रिया आणि अधिकृत लिंक्सची माहिती येथे दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १० च्या परीक्षेचा निकाल आज (८ मे २०२६) रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर होत आहे. याबद्दलची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व विभागांचा निकाल एकाच वेळी अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

हा निकाल डिजीलॉकर (DigiLocker) वरही विद्यार्थ्यांना पाहता येईल. https://results.digilocker.gov.in या लिंकवरून परीक्षार्थी त्यांचे गुण जाणून घेऊ शकतात. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC) निकाल २०२६ पाहण्यासाठी आणि डिजिटल मार्कशीट डाऊनलोड करण्याची माहिती येथे देण्यात आली आहे.

DigiLocker MSBSHSE 10th Marksheet Download: डिजीलॉकरवर १०वी निकाल पाहण्याची प्रक्रिया:

पहिल्यांदा digilocker.gov.in वर जा किंवा मोबाईलमध्ये DigiLocker App उघडा.

त्यानंतर तिथे लॉगिन करा. जर अकाउंट नसेल तर आधार नंबर वापरून साईन-अप करा.

जर अकाउंट असेल तर युजरनेम आणि पिन टाकून Login करा.

त्यानंतर होमपेजवर ‘Education’ विभागात जा आणि ‘Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education’ निवडा.

त्यानंतर ‘Class X Marksheet’ किंवा ‘SSC Result 2026’ हा पर्याय निवडा.

त्यानंतर तिथे तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) आणि आईचे नाव (Hall Ticket वर दिल्याप्रमाणे) टाका.

त्यानंतर ‘Get Document’ वर क्लिक करा.

नंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

त्यानंतर विद्यार्थी डिजिटल मार्कशीट आणि प्रमाणपत्र डाउनलोड किंवा सेव्ह करू शकतात.

Leave a Comment