Post Office Yojana पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज Post Office Yojana 2026

Post Office Yojana 2026 : आपली बचत योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करत असाल, तर आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, ज्यांना कमी जोखीम आणि निश्चित उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना एक विश्वासार्ह पर्याय ठरतात. या योजना केंद्र सरकारच्या पाठिंब्याने चालवल्या जात असल्यामुळे गुंतवणूक सुरक्षित राहते आणि त्यामुळे अनेक गुंतवणूकदार यांना प्राधान्य देतात.

पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट (Time Deposit) योजना ही अशाच सुरक्षित योजनांपैकी एक आहे. ही योजना बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट (FD) प्रमाणेच कार्य करते. यात तुम्ही ठराविक कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करून त्यावर आकर्षक व्याज मिळवू शकता.

योजनेची वैशिष्ट्ये

खातं उघडण्यासाठी किमान रक्कमः ₹1,000

कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही

कालावधीचे पर्यायः 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष

सध्याचे व्याजदर

१ वर्ष: ६.९%

२ वर्षे: ७.०%

३ वर्षे: ७.१%

५ वर्षे: ७.५%

1 लाख गुंतवल्यास किती मिळेल?

जर तुम्ही 5 वर्षांसाठी ₹1,00,000 गुंतवले, तर 7.5% दराने (त्रैमासिक चक्रवाढ व्याजानुसार) मुदतपूर्तीवेळी तुम्हाला सुमारे ₹1,44,995 मिळतील. म्हणजेच तुम्हाला एकूण ₹44,995 इतके व्याज मिळेल.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना ही सुरक्षित, सोपी आणि स्थिर परतावा देणारी गुंतवणूक आहे. विशेषतः ज्यांना जोखीम टाळायची आहे आणि खात्रीशीर उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम पर्याय ठरू शकते.

Leave a Comment