एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत घटना मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यातील अनुसूचित पारधी जमातीच्या नागरिकांसाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2025 26 या आर्थिक वर्षात विविध कल्याणकारी योजना करण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी 23 मार्च 2026 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय कळवण येथे सादर करावेत असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ कश्मिरा संखे यांनी केले आहे
या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित पारधी जमातीतील महिला तसेच बेरोजगार युवक-युवतींना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे आहात आहे शासनाच्या शंभर टक्के अनुदान तत्त्वावर विविध व्यवसायासाठी आवश्यक साहित्य यासाठी अर्थसाहाय्य किंवा थेट साहित्य पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही मंजुर योजनेमध्ये किराणा दुकान व्यवसाय साठी संपूर्ण अनुदानावर साहित्य उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे
शिवाय पीठ गिरणी व्यवसायासाठी आवश्यक यंत्रसामग्री तसेच रसवंती व्यवसायासाठी लागणारे साहित्य पूर्ण अनुदानावर दिले जाणार आहे ग्रामीण व शहरी भागात या व्यावसायिकांना मोठी मागणी असल्यामुळे संबंधित कुटुंबांना स्थिर उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यासाठी मदत होणार तसेच बेरोजगार युवकांसाठी इलेक्ट्रॉनिक दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य 100 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे आणि लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही अर्थसाह्य ची तरतूद आहे बेरोजगार साठी कटलरी व ब्युटी पार्लर व्यवसाय साठी साहित्य खरेदीसाठी पूर्ण अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे
या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळून त्यांना घरबसल्या किंवा स्थानिक पातळीवर व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे नमुन्यातील अर्ज 23 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत मालेगाव नांदगाव तालुक्यातील गट विकास अधिकारी कार्यालयात शासकीय सुट्ट्या वगळून उपलब्ध असतील इच्छुक नागरिकांनी फॉर्म काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे
अर्जदार हा अनुसूचित जमातीतील असणे आवश्यक असून त्यासाठी जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक व पासबुक झेरॉक्स मागील काही वर्षातील उत्पन्नाचा दाखला बीपीएल प्रमाणपत्र असल्यास अपंग विधवा किंवा परित्यक्ता लागू असल्यास मतदान ओळखपत्र पॅन कार्ड तसेच अलीकडील दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे जोडणे आवश्यक असेल याशिवाय संबंधित योजनेचा लाभ यापूर्वी या किंवा इतर कोणत्याही कार्यालयामार्फत लाभ घेतलेला नाही असे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे
या योजनेचा लाभ सटाणा मालेगाव तालुक्यातील अनुसूचित पारधी जमातीचे नागरिक घेऊ शकतात शासनाच्या या उपक्रमामुळे पारधी समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना व्यवसायाच्या माध्यमातून सूक्ष्म होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती समाजाच्या वर्गीकरण विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ कश्मिरा संखे यांनी पत्र पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे शासनाच्या या योजनेमुळे अनुसुचित पारधी समाजाच्या आर्थिक पन्नास उत्पन्नस नवे बळ मिळणार असून स्वावलंबी च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जाणार आहे





