यवतमाळ,वाशीम आणि अमरावती जिल्ह्याची पैसेवारी जाहीर – शेतकऱ्यांचे लक्ष आता सुधारित अहवालाकडे

महाराष्ट्रातील विदर्भ विभागात यंदाच्या खरीप हंगाम पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला अतिवृष्टी सततचा पाऊस आणि पिकांवर आलेल्या या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना शासनाकडून जाहीर झालेली पैसेवारी अहवाल 2025 शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे यवतमाळ-वाशिम आणि अमरावती या तीन जिल्ह्यात पैसेवारीत मोठा फरक दिसून येत आहे

यवतमाळ जिल्ह्यातील पैसेवारी स्थिती

यवतमाळ जिल्हा हा दरवर्षी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करणारा जिल्हा मानला जातो यंदा ही परिस्थिती वेगळी नाही अधिकृत माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यांनी मध्ये पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त नोंदवली गेली आहे याचा अर्थ असा की शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा दर 50 टक्क्यापेक्षा दर जास्त मांडला आहे तथापि अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रत्यक्ष झालेले नुकसान पैसेवारी प्रलंबित होत नाही काही गाव मध्ये पिके पूर्णपणे वाहून गेले असून 55 ते 60 पैसे इतकी पैसेवारी दाखवण्यात आले आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष सुधारित पैसेवारी अहवालाकडे लागले आहे

वाशिम जिल्हा सर्व गावांमध्ये 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी

वाशिम जिल्ह्यातील परिस्थिती काहीशी वेगळी दिसून येते वाशिम जिल्ह्यातील सर्व 793 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 47 पैसे इतकी ठरली आहे जी विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे की वाशीम जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा योग्य अंदाज शासन अधिकाऱ्यांनी घेतला नाही काही गावांमध्ये सोयाबीन कपाशी तूर आणि मका या पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहेत परंतु तरीसुद्धा 47 पैसे एवढीच पैसेवारी दाखवण्यात असल्याचे मत व्यक्त होत आहे स्थानिक शेतकरी संघटनेने तुरळक पिकांचे पंचनामे पूर्ण पर्यवेक्षक करून सुधारित अहवाल देण्याची मागणी आहे

अमरावती जिल्ह्यातील पैसे वारी 56 पैसे प्रश्नचिन्ह उपस्थित

विदर्भातील तिसरा प्रमुख जिल्हा म्हणजेच अमरावती येथे देखील पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहेत मात्र शासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्याची सरासरी पैसेवारी पैसे इतकी नोंदवली गेली आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कारण अनेक भागांमध्ये सोयाबीन तूर आणि कपाशीचे नुकसान 70 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत झाले आहेत पैसेवारी 53 पैसे दाखवण्यात आली आहे काही शेतकऱ्यांनी या अहवालाला नजर अंदाज पैसेवारी असे नाव दिले आहे प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित अहवाल तयार करण्याची मागणी केली जात आहे

सुधारित पैसेवारी अपेक्षा वाढली

आता तिने जिल्ह्यातील शेतकरी सुधारित पैसेवारी अहवाल 2025 कडे अपेक्षेने पाहात आहेत मात्र शासन दरवर्षी प्राथमिक अहवालानुसार सर्वाधिक अहवाल जाहीर करते या प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्याकडून पुन्हा पंचनामे घेतले जातात आणि प्रत्यक्ष नुकसानीचा पुनर्विचार केला जातो शेतकऱ्यांना आशा आहे की या सुधारित अहवालात वास्तविक नुकसानीचे योग्य प्रतिबिंब दिसते आणि नुकसान भरपाई चा दर वाढेल

पैसेवारी म्हणजे काय

पैसेवारी म्हणजे शेतीतील पिकांचे नुकसान टक्केवारीत मोजण्याची पद्धत

  • 100 पैसे = पूर्ण नुकसान नाही
  • 50 पैसे = 50 % नुकसान
  • 30 पैसे = 70 % नुकसान

या आकडेवारीच्या आधारे शासन शेतकऱ्यांना अनुदान आणि नुकसान भरपाई ठरवते त्यामुळे पैसेवारी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे

शेतकऱ्यांची मागणी आणि अपेक्षा
  1. पंचनामे पुन्हा करून वास्तविक नुकसान दाखवावे
  2. उपग्रह व हवामान आकडेवारीचा वापर करून योग्य अंदाज घ्यावा
  3. पैसेवारी 50 पेक्षा कमी दाखवल्या गावांचा पुनर्विचार व्हावा
  4. नुकसानभरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी

निष्कष : यवतमाळ आणि वाशिम अमरावती जिल्ह्यातील पैसेवारी अहवाल 2025 वरून स्पष्ट होते की शासनाने प्राथमिक स्तरावर अंदाज घेतला आहे पण वास्तविक नुकसानीचे चित्र वेगळे आहे शेतकरी वर्ग आता सुधारित पैसेवारी आणि भरपाई कडे लक्ष ठेवून आहे जर सुधारित अहवाल अन्याय झाला तर पावसाने जोडलेल्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळू शकतो

Leave a Comment