वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून 18 मे 2025 पासून शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 साठी तूर, मूग, ज्वारी, सोयाबीन (soybean biyane anudan) अशा विविध पिकांच्या विविध वाणांची बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त, 18 मे 2025 पासून शेतकऱ्यांना विविध वाणांची बियाणे उपलब्ध करून दिली जातील.
ज्वारी:
- परभणी शक्ती वाण – 500 बॅग
- दर: ₹125 प्रति किलो
- बॅग साइज: 4 किलो
- प्रति बॅग किंमत: ₹500
मूग:
- BM 20032 वाण – 330 बॅग
- दर: ₹220 प्रति किलो
- बॅग साइज: 6 किलो
- प्रति बॅग किंमत: ₹1320
तूर:
- BDM 716 (लाल) – 300 बॅग
- BDN 711 (पांढरी) – 300 बॅग
- BSMR 853 (पांढरी) – 80 बॅग
- BSMR 736 (लाल) – 100 बॅग
- BDN 1341 गोदावरी (पांढरी) – 800 बॅग
- दर: ₹250 प्रति किलो
- बॅग साइज: 6 किलो (प्रति बॅग ₹1500)
- BDN 1341 गोदावरी वाण: 2 किलोच्या 1600 बॅग देखील उपलब्ध
सोयाबीन:
- MAUS 162 – 751 बॅग
- MAUS 158 – 300 बॅग
- MAUS 612 – 376 बॅग
- दर: ₹100 प्रति किलो
- बॅग साइज: 26 किलो
- प्रति बॅग किंमत: ₹2600
महत्त्वाचे: प्रत्येक शेतकऱ्याला एकच बॅग वितरित केली जाणार आहे.
मित्रांनो, बियाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून सुधारित बियाणे आता योग्य दरात उपलब्ध होणार आहे.
आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे.
भेटूयात नव्या माहितीसह! धन्यवाद!